शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडून तीन वर्षात ३९ वीज चोरांवर कारवाई

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

संग्रामपूर तालुक्यातील खेडेगावामध्ये अवैध घरगुती विद्युत चोरी.

संग्रामपूर (जि. बुलडाणा): संग्रामपूर तालुक्यातील खेडेगावामध्ये अवैध घरगुती विद्युत चोरी तसेच शेतामधील कृषीपंपासाठी मोठय़ा प्रमाणात विद्युत चोरी होत आहे.तालुक्यामध्ये सन २0१३ ते जुलै २0१५ या तीन वर्षामध्ये ३९ अवैध विद्युत चोरी करणार्‍यांवर कारवाई झाली आहे; परंतु तालुक्यातील अवैध घरगुती व शेतातील कृषी पंपासाठी होणारे अवैध विद्युत चोर्‍यांचे प्रमाण वरील तीन वर्षांमधील या आकड्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकार्‍यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गत तीन वर्षांमध्ये एकही शेतातील कृषीपंपावर कारवाई न झाल्याची माहिती महावितरण कार्यालयाकडून मिळाली आहे. तालुक्यामधील अवैध घरगुतीसाठी वीज चोर्‍यांचे प्रमाण वर्षनिहाय कारवाई पुढीलप्रमाणे :यामध्ये सन २0१३ मध्ये ११ कारवाया, सन २0१४ मध्ये १९ कारवाया, जुलै १५ मध्ये १ कारवाई याप्रमाणे ३ वर्षामध्ये ३९ कारवाया करण्यात आल्या. सद्यस्थितीत संग्रामपूर शहर वगळता खेडेगावामध्ये घरगुती विद्युत चोरी तसेच शेतातील कृषी पंपाकरिता विद्युत चोरीला उधाण आले आहे. यामध्ये बोडखा, धामणगाव, पळशी झांशी, मारोड, सावळा, निरोड, पंचाळा, भिलखेड, काकोडा, खोद्री, आस्वंद या गावांमध्ये दिवसाढवळ्या नागरिक विद्युत खांबावरील तारेवर आकोडे टाकुन विद्युत चोरी करीत आहेत. परिसरातील काही शेतामध्ये नवीन विहिरी खोदल्या असून, या विहिरींना पाणी लागलेले आहे; परंतु शेतामध्ये विद्युत खांब नसल्याकारणाने शेजारील शेतामधील खांबावरून १ ते दीड हजार फूट केबल टाकून या खांबावरील तारेवर आकोडे टाकून अवैध विद्युत चोरी सुरू आहे. यामध्ये एखादेवेळी विजेच्या धक्क्याने मृत्यूसुध्दा होऊ शकतो. त्याचप्रमाणे घरगुतीसाठी विद्युत चोरी करीत असताना जी विद्युत खांबावर केबल टाकल्या जाते यामधील एक केबल (अर्थींंग) म्हणून जमिनीमध्ये गाळल्या जाते. या केबलला स्पर्श झाल्यास अपघात होऊ शकतो. महावितरणकडे तक्रारी होतात; परंतु कार्यवाही होत नाही.