शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

२८८ ग्रामपंचायतींचे कारभारी आज ठरणार

By admin | Updated: September 9, 2015 01:53 IST

बुलडाणा जिल्ह्यातील उर्वरीत २२८ सरपंचपदासाठी निवडणूक; प्रशासन सज्ज.

बुलडाणा : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निवडणूक झालेल्या २२८ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंचपदासाठी निवडणूक ३१ ऑगस्ट रोजी झाली होती. तर उर्वरित २८८ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यासाठी निवडणूक प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. जिल्हय़ातील ५२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यामध्ये ऑगस्टमध्ये मुदत संपणार्‍या २२८, सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या २८८ तर ऑक्टोबरमध्ये मुदत संपणार्‍या ५ ग्रा.पं.चा समावेश आहे. यातील पहिल्या टप्प्यातील सरपंचपदाच्या निवडणुका ३१ ऑगस्टला तर उर्वरित २८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ९ सप्टेंबरला होऊ घातल्या आहेत; तसेच संग्रामपूर तालुक्यातील ३ सरपंचांची निवडणूक २२ सप्टेंबरला तर खामगाव तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींची निवडणूक ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी तहसील पातळीवर प्रशासकीय जय्यत तयारी करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात यासाठी विशेष सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अध्यासी अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, सहलीवर गेलेले ग्रामपंचायत सदस्य परतीच्या मार्गावर असून, सरपंचपदासाठी त्यांनी तडजोडी केल्या आहेत. मलकापूर तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक होणार आहे. त्यात नरवेल, दसरखेड, विवरा, तिघ्रा, चिखली, भानगुरा, दुधलगाव खुर्द, शिराढोण, लासुरा, लोणवडी, जांबुळधाबा, हरणखेड, खामखेड, माकनेर, वडोदा, हिंगणाकाझी, कुंड खुर्द, निंबारी व घिर्णी ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर संग्रामपूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक ९ सप्टेंबर रोजी होऊ घातली आहे. यापैकी ११ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिला राखीव आहे. सकाळी १0 ते ११ अर्ज घेणे, दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात होऊन २.१0 वा. अर्जांंची छाननी, २.२0 वा. मागे घेण्याची वेळ आणि त्यानंतर हात उंचावून किंवा गुप्त पद्धतीने मतदान घेतले जाणार आहे.