शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

२७ लाखाचा गुटखा पकडला!

By admin | Updated: May 4, 2017 00:31 IST

ट्रक व मुद्देमाल जप्त: बुलडाणा एलसीबीची चिखलीनजीक मेहकर फाट्यावर कारवाई

चिखली : स्थानिक मेहकर फाट्यानजिक बुलडाणा एलसीबीने केलेल्या कारवाईत के.जी.एन. धाब्याच्या पाठीमागे उभ्या असलेल्या ट्रकमधून सुमारे २७ लाख ८१ हजार रुपयाचा गुटखा पकडण्यात यश आले आहे. या गुटख्यासोबत ट्रक व इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३ एप्रिल रोजी ४ वाजेच्या सुमारास करण्यात आली असून, यामुळे गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहे.शासनाकडून कायद्यानुसार गुटखा विक्री बंद करण्यात आली असली, तरी छुप्या मार्गाने गुटखा विक्री होत आहे. बंदी काळातही अवैधपणे व सर्रास विकल्या जाणाऱ्या गुटख्यावरील ही मोठी कारवाई असून, जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांना खबऱ्याने दिलेल्या गुप्त माहितीनुसार, चिखली येथील मेहकर फाट्यावर असलेल्या के.जी.एन. धाब्याच्या पाठीमागे ट्रकमध्ये गुटख्याचा मोठा प्रमाणात साठा आहे, अशी माहिती मिळाली असता त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोरेगावकर, बी.के.चव्हाण, गी.व्ही.माहुरे, एस.एल. शिरोसिया यांच्यासह घटनास्थळी पोहोचलो असता, ट्रक क्रमांक एम.एच.२८ बी.८८१६ या बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये समोरील बाजूला फ्रुट चे रिकामे कॅरेट रचलेले होते; मात्र कॅरेट हटवून पाहिल्यानंतर पांढऱ्या पोत्यांमध्ये गुटखा असल्याचे निष्पन्न झाल्याने ट्रकचा दरवाचा तोडून ट्रक पोलीस स्टेशनला आणला. सखोल तपासणी अंती या पोत्यांमध्ये विशिष्ट कंपनीच्या गुटख्याची ५० पोती आढळून आली. एका पोत्यामध्ये ६ बँग याप्रमाणे एकूण ३०० बॅग व एका बॅग मध्ये ५५ पुडे असे एकूण १६५०० पुडे व त्याची बाजार किंमत २७ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा आणि ३ हजार रुपये किमतीचे ७२ मोठे कॅरेट आणि ट्रक असा सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोरेगावकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना अन्न सुरक्षा अधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, सदर गुटख्याचा ट्रक हा निसार हाजी अब्दुल कादर यांच्या मालकीच्या जागेत सापडल्यामुळे निसार हाजी अब्दुल कादर यास मुख्य आरोपी करण्यात आले असून, त्याच्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ नुसार कारवाई करणार असल्याचे सांगून सदर प्रकरणातील आरोपी निसार हाजी फरार झाल्याचे त्यांनी सांगितले. ४० लाखांचा माल जप्ततपासात विशिष्ट कंपनीच्या गुटख्याची ५० पोती आढळून आली. एका पोत्यामध्ये ६ बँग याप्रमाणे एकूण ३०० बॅग व एका बॅगमध्ये ५५ पुडे असे एकूण १६५०० पुडे व बाजार किंमत २७ लाख ८१ हजार रूपयांचा गुटखा आणि ३ हजार रूपये किमतीचे ७२ मोठे कॅरेट आणि ट्रक असा सुमारे ४० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.