दारु गाळणार्‍याला २५ हजाराचा दंड

By Admin | Updated: June 26, 2014 02:05 IST2014-06-26T01:42:17+5:302014-06-26T02:05:14+5:30

शेगाव न्यायालयाचा निर्णय : दंड न भरल्यास तीन महिन्यांची कैद

25 thousand penalty for smoker smoker | दारु गाळणार्‍याला २५ हजाराचा दंड

दारु गाळणार्‍याला २५ हजाराचा दंड

शेगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत भोरसी येथील शिवारात दारु गाळणार्‍या व्यक्तीला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवून २५ हजारांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. हा निकाल न्यायालयाने काल मंगळवारी शेगाव न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश ए.एस.लांजेवार यांनी दिला.
शेगाव तालुक्यातील भोरसी येथील किशोरसिंग रामसिंग राजपूत आपल्या घरात दारु गाळत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एन.के. मावळे यांना मिळाल्यावरुन त्यांनी ७ ऑगस्ट २0१३ रोजी पंच व आपल्या ताफ्यासह किशोरसिंग राजपूत यांच्या घरात धाड टाकली.
यावेळी किशोरसिंग हा आपल्या घरात मोहफुलाच्या रसायनाने गावठी दारु तयार करीत असल्याचे दिसून आले. यावेळी त्याच्याकडून दारु गाळण्याचे साहित्य, १५ डब्बे मोहफुलाचे रसायन, १0 लिटर गावठी दारु पंचांसमक्ष जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जी.बी.मोरे यांच्या तक्रारीवरुन कलम ६५ (ख) नुसार सदर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने यामध्ये चार साक्षीदार तपासले आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरुन किशोरसिंग राजपूत दोषी आढळल्याने त्यास २५ हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कै द असा निकाल दिला. सरकार पक्षाच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता मंगेश मानकर यांनी काम पाहिले.

Web Title: 25 thousand penalty for smoker smoker