२५ शेतकर्‍यांची फसवणूक

By Admin | Updated: May 29, 2014 00:51 IST2014-05-29T00:35:12+5:302014-05-29T00:51:05+5:30

२५ शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करून २४ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली

25 Cheating of Farmers | २५ शेतकर्‍यांची फसवणूक

२५ शेतकर्‍यांची फसवणूक

बुलडाणा : तालुक्यातील पळसखेड नाईक येथील २५ शेतकर्‍यांचे सोयाबीन खरेदी करून २४ लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी सुरेश बालोद व रमेश बालोद यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचा जामिन अर्ज फेटाळला आहे. बुलडाणा तालुक्यातील पळसखेड नाईक येथील २५ शेतकर्‍यांकडून सुरेश बालोद व त्यांचा भाऊ रमेश या दोघांनी २४ लाख ९९८0 रुपयाची सोयाबीन खरेदी केली. खरेदीची रितसर पावती देऊन दोन-तीन दिवसात पैसे देतो, असे आश्‍वासन या शेतकर्‍यांना दिले होते; मात्र पेसे देण्यास या दोघांनी टाळाटाळ केल्याने शेतकरी भुपेश मांगीलाल जाधव यांनी या दोघा विरूद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरून बालोद बंधूंना अटक करण्यात आली. आरोपींनी या गुन्ह्यातून जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश विनय जोशी यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तथापि, शेतकर्‍यांनी मोठय़ा नैसर्गिक आपत्तीतून सोयाबीन पीक घेतले. त्यातही सदर व्यापार्‍याने विकत घेतलेल्या सोयाबीनचे पैसे न दिल्यामुळे ऐन पेरणीत शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक केली. हा गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयाने आरोपीचा जामिन अर्ज फेटाळला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड.विजय सावळे यांनी यशस्वी बाजू मांडली.

Web Title: 25 Cheating of Farmers