अपहरण झालेल्या व्यक्तीचा २४ तासांत शोध

By Admin | Updated: May 1, 2017 23:44 IST2017-05-01T23:44:11+5:302017-05-01T23:44:11+5:30

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या आंचली येथील व्यक्तीचे २९ एप्रिलला सिंदखेडराजा बसस्थानक परिसरातील वर्षा रसवंती येथून सायंकाळी अपहरण झाले होते.

24 hour detection of the kidnapped person | अपहरण झालेल्या व्यक्तीचा २४ तासांत शोध

अपहरण झालेल्या व्यक्तीचा २४ तासांत शोध

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या आंचली येथील व्यक्तीचे २९ एप्रिलला सिंदखेडराजा बसस्थानक परिसरातील वर्षा रसवंती येथून सायंकाळी अपहरण झाले होते. याबाबत सिंदखेडराजा पोस्टेने तपास सुरू करून अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला गजाआड केले.
याबाबत संजय दलसिंग मरमट यांनी भाऊ रंजित दलसिंग मरमट यांचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार, ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दिलीप काळे, पोकॉ शिवाजी बारगजे यांनी अपहरणकर्त्याची शोधमोहीम सुरू केली. ३० एप्रिल रोजी अपहरणकर्त्यास बोधेगाव ता.शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील केदारेश्वर साखर कारखान्याच्या खोलीत कोंडून ठेवले होते. अवघ्या २४ तासात ही शोधमोहीम पूर्ण होऊन, रंजित यांना सोडवून आरोपी लाभसेटवाल याला अटक केली. साखर कारखाना सेक्युरिटी इन्चार्ज गायकवाड व सचिन घायाळ, कारखाना चालक फरार आहेत. त्यांच्यावर ३६३ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 24 hour detection of the kidnapped person