बलात्कारप्रकरणी आरोपीला १0 वर्षे सश्रम कारावास

By Admin | Updated: April 30, 2017 02:47 IST2017-04-30T02:47:37+5:302017-04-30T02:47:37+5:30

आरोपीला मदत करणा-या काकुलाही शिक्षा

10 years rigorous imprisonment for raping the accused | बलात्कारप्रकरणी आरोपीला १0 वर्षे सश्रम कारावास

बलात्कारप्रकरणी आरोपीला १0 वर्षे सश्रम कारावास

खामगाव : बलात्कार करुन अल्पवयीन कुमारिकेवर मातृत्व लादणार्‍या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. आरोपीला मदत करणार्‍या त्याच्या काकुलाही न्यायालयाने हीच शिक्षा ठोठावली आहे.
सातळी ता. जळगाव जा.येथील पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नात्याने तिचा भाऊ असलेल्या विशाल दगडू गवई (वय १८) याने गतवर्षी एप्रिल महिन्यात आपल्या घरी बोलावून बलात्कार केला होता. यावेळी त्याची काकु रेखा शेषराव गवईने आरोपीला मदत केली. यानंतर आरोपीने तिला शेतात नेऊन बलात्कार केला. दरम्यान, सदर मुलीला गर्भधारणा झाली. पाच ते सहा महिन्याची गर्भवती असलेल्या पीडीत मुलीला अकोला येथील चाईल्ड हेल्पलाईनमध्ये पाठविण्यात आले. तेथे पीडीतेने मुलीस जन्म दिल्यानंतर करण्यात आलेल्या डीएनए चाचणीमध्ये विशाल गवई हा दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी १३ सप्टेंबर २0१४ रोजी सदर मुलीच्या आईने जळगाव जामोद पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर शनिवारी जिल्हा व सत्र न्यायालय क्र.१ चे न्या. सुर्यवंशी यांनी दिला.

Web Title: 10 years rigorous imprisonment for raping the accused