शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे १ कोटी ४३ लाख थकले

By admin | Updated: April 20, 2017 00:04 IST

२१३ शाळांची स्थिती : जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक त्रस्त

उद्धव फंगाळ - मेहकरशासनाने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पोषण आहार सुरु केला आहे. विद्यार्थ्यांसाठी ही योजना जरी चांगली असली, तरी शासनाच्या या योजनेकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २१३ शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे जवळपास १ कोटी ४३ लाख ३९ हजार रुपये थकले आहेत. त्यामुळे सर्वच शाळेचे मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत.जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शासनाने पोषण आहार, पुरक आहार योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या वर्ग १ ते ८ वर्गातील विद्यार्थ्यांना दररोज पोषण आहार दिला जातो. शासनाने सुरु केलेली ही योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे; मात्र ही योजना काही दिवसांपासून कुचकामी ठरत आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागत जिल्हा परिषदेच्या २१३ शाळेचे पोषण आहाराचे जुलै २०१६ पासून जवळपास १ कोटी १७ लाख १५ हजार ५९१ तर स्वयंपाकी व मदतनिस यांचे आॅक्टोबर २०१६ पासूनचे मानधन २६ लाख, २४ हजार रुपये शासनाकडे थकले आहेत. त्यामुळे सध्या मेहकर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत. शासनाने लवकरात लवकर पोषण आहाराचा पैसा वाटप करण्याची मागणी होत आहे.उधारीवर घेत आहेत सामानमेहकर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या २१३ शाळेचे पोषण आहाराचे बिले गेल्या ९ महिन्यापासून थकल्याने भाजीपाला व इतर सामान मुख्याध्यापकांना उधारीवर घ्यावे लागत आहे. जवळपास ९ महिन्यापासून बिले न मिळाल्याने आता संबंधित दुकानदार उधार देत नसल्याने अनेक मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करुन सामान आणून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवावा लागत आहे.