शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

वरठीत पाण्यासाठी तरूणांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 23:40 IST

मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाण्याचा प्रश्न बनला जटिल : चार दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. दरम्यान, गुरूवारला दुपारी गावातील काही नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करीत दूषित पाण्याच्या मुद्दा उपस्थित केला. यावर तोडगा न निघाल्यास ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना रोषाला सामोरे जावे लागणार आहे.एक महिन्यापासून नळाला दूषित पाणी पुरवठा सुरु आहे. दूषित पाणी पुरवठ्याबाबत कुणी विचारपुस केली तर ग्रामपंचायतमधून परत पाठविण्यात येते. गतवर्षी नदी पात्रातील जलसाठा घटल्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी माजी सरपंच संजय मिरासे यांच्यावर टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. नदीपात्रात जलसाठा नसल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होणे स्वाभाविक होते. परंतु मुबलक पाणी असताना पाणी टंचाई उदभवल्याने गावात तीव्र असंतोष आहे.जल शुद्धीकरण यंत्रात आलेला बिघाड हा तांत्रिक नसून पंचायतीच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. जल शुद्धीकरण यंत्रात प्रमाणित साहित्य न वापरल्यामुळे दूषित पाणी पिण्याची नामुष्की नागरिकांवर ओढवली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यामुळे आजारी होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. दिवसेंदिवस नागरिकाचे पाण्यासाठी बेहाल होत असल्याने आज गुरूवारला काही तरूणांनी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला. यावेळी किशोर मारवाडे, अश्विन मेश्राम, प्रदीप भालाधरे, शुभम तिरपुडे भुपेश शहारे, पंकज वासनिक, निशांत गजभिये उपस्थित होते. पाण्याविषयी चर्चा करण्यासाठी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित नसल्याने पुन्हा हल्लाबोल आंदोलन करण्याचे या तरूणांनी बोलून दाखविले आहे. यावेळी उपसरपंच सुमित पाटील व ग्रामपंचायत सदस्य संघदीप उके यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली.पाणी वाटपात भेदभावनव्याने सत्तेत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याची जबाबदारी घेणाºया एका पदाधिकाऱ्याने काही सदस्यांना हाताशी धरून पाणी वाटपात भेदभाव करीत असल्याचा आरोप होत आहे .सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी हेतुपरस्पर अनेक भागातील पाणी वाटपाचे वेळापत्रक बदलून पाणी पुरवठा करण्याची वेळ कमी करण्यात आली आहे. एकाच भागात अनेकवेळा नळाला पाणी देण्यात येते तर काही भागातील नागरिकांचा पारी पुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप होत आहे.वेळापत्रक नसल्याने घोळअनेक वर्षांपासून पाणी वाटपाचे वेळापत्रक सुरळीत होते. सद्यस्थितीत सुरु असलेल्या कारभारामुळे पाणी वाटपात घोळ निर्माण झाला आहे. पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक नियोजित नसल्याने विविध प्रश्न निर्माण होत आहेत. नळ येण्याची निर्धारित वेळ माहिती नसल्याने अनेकांना नळाचे पाणी नियमित मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई