शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो, खेळणे बनण्यापेक्षा खेळाडू बनून आयुष्य सार्थक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST

शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणमन रेशीम उद्योग संचालक भाग्यश्री बानायत, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप सोळके आदी उपस्थित होते

ठळक मुद्देवेणुगोपाल शेंडे। सानगडी येथे आयोजित प्रबोधन कार्यक्रमाचा हजारोंनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
सानगडी : माळी समाजाला शैक्षणिक, आर्थिक मागासलेपणातून बाहेर काढायचे असेल तर तरुणांनी खेळण बनण्यापेक्षा खेळाडू बनून आयुष्याचे सार्थक करावे , असे प्रतिपादन सेवानिवृत्त परिवहन अधिकारी वेणुगोपाल शेंडे यांनी केले.
सानगडी येथे प्रबोधन कार्यक्रम निमित्ताने तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शैक्षणिक मागासलेपणा दुर करुन जास्तीत जास्त तरुणांनी शिक्षण घेवून समाजातील मागासलेल्या लोकांकरिता काम करण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणमन रेशीम उद्योग संचालक भाग्यश्री बानायत, अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रमुख वक्ते दिलीप सोळके आदी उपस्थित होते
यावेळी भाग्यश्री बानायत यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक धान शेती सोडून आर्थिक प्रगतीसाठी किमान एक एकर तरी रेशीम उद्योग उभारावा, असे आवाहन केले. पारंपारिक धान शेतीपेक्षा रेशीम शेतीतून पाच पट अधिक उत्पादन मिळते याची त्यांनी उदाहरणाद्वारे खात्री दिली.
अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे म्हणाले, समाजबांधवांनी समाजकारणासोबत राजकारणाकडे वळून प्रगतीची दारे ज्या संसदेतून किंवा विधानसभेतून उघडली जातात, त्याठिकाणी प्रतिनिधीत्व मिळवण्यासाठी प्रयत्न केला तरच समाजाची प्रगती अधीक वेगाने होऊ शकते, अशी आशावादी भूमिका मांडली. याप्रसंगी जनार्धन लोथे स्मृती पुरस्काराने मीनल गोटेफोडे, दिशा खर्डेकर, साक्षी गोटेफोडे, अश्विनी राऊत, भाग्यरी उके, शिवानी इरले, प्रतीक बाचलकर यांना गौरविण्यात आले.
संचालन माणिक खर्डेकर, प्रा. नाजुकराम बनकर यांनी तर, आभार प्रदर्शन विहिरगावचे सरपंच रविंद्र खंडाळकर केले. कार्यक्रमासाठी हरिभाऊ बनकर, विजय खंडाळकर, दीपक उपरीकर, मनोहर नगरकर, मनोहर गोविंदा इटवले, वासुदेव नगरकर, मनोहर ईटवले, रविशंकर लोथे, धनराज लोथे, मुनीश्वर उपरिकर, जनार्धन डोंगरवार, चंद्रहास खंडाळकर, चुन्नीलाल लोथे, नरेश खर्डेकर, मोहन चोपकर, विनोद शेंडे, श्रीराम राऊत, धनीराम सावरकर, अनिल बारस्कर, संगीता बारस्कर, राजीराम ईटवले, शालीक खर्डेकर, खुशराम किरणापुरे, विनायक भुसारी, वासुदेव गायधने, रुपराम इटवले आदीनी सहकार्य केले.

माळी समाजाचा स्तुत्य उपक्रम
सानगडी येथे गत तीन वर्षांपासून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील अंधश्रध्दा, वाईट चालीरिती यांच्यावर घाणाघाती प्रहार करुन त्या कशा चुकीच्या आहेत, हे अनेक उदाहरणाद्वारे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते दिलीप सोळके यांनी पटवून दिले.यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.