शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

तरूणांनो, हक्कासाठी लढा द्या

By admin | Updated: February 24, 2016 00:38 IST

देशात शेतकरी शेतमजुरांना किमान वेतनाच्या नावाखाली रोजगार हमी योजनेच्या कामावर नाममात्र मजुरी दिली जाते.

विजय जावंधिया यांचे प्रतिपादन : पवनीत मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचा कार्यक्रमपवनी : देशात शेतकरी शेतमजुरांना किमान वेतनाच्या नावाखाली रोजगार हमी योजनेच्या कामावर नाममात्र मजुरी दिली जाते. असे असताना महागाईचा निर्देशांक वाढला म्हणून शासकिय कर्मचाऱ्यांना वेतन आयोग गठीत करुन सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याची तयारी केंद्र व राज्य सरकार करु लागले आहे. दिवसभर शेतात घाम गाळणाऱ्यांना त्यांचा कष्टाचा मोबदला मिळावा ह्या हक्काच्या लढाईसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन लढा द्यावा, असे आवाहन शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केले.मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेच्या सभागृहात तालुका विकास परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळीे डॉ. विक्रम राखडे, डॉ. राजेश नंदुरकर, डॉ. सुनिल जीवनतारे, गेडाम गुरुजी, दादा आगरे उपस्थित होते. यावेळी जावंधिया म्हणाले, वेतन आयोगाला आमचा विरोध नाही परंतू पैशाच्या व्यवस्थापनात गावातील लोकांना नागवले जात आहे. महात्मा फुलेनी शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथात शेतकऱ्यांच्या ज्या समस्यांना वाचा फोडली, देशाच्या स्वातंत्र्यानंतरही समस्या जशाच्या तशा आहेत. वेतन आयोगानुसार वेतन देण्यासाठी शासनाकडे पैसे आहेत. शेतकऱ्यांना देय नसलेली सबसीडी काढून घेतली जात आहे. व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा खर्च वाढत आहे. कुटूंबाचा खर्च वाढतो, सामाजिक दायित्वाचा खर्च वाढतो. शासनाच्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी उत्पादन वाढविले. त्यामुळे दुष्काळ पडल्यानंतरही अन्न धान्याची टंचाई पडणार नाही. परंतू उत्पादन वाढवितांना खर्च वाढला पण शेतमालाला भाव मिळत नाही हे दुर्देव आहे. त्यामुळेच देशात राजकीय, आर्थिक व सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.याप्रसंगी शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार व मच्छी उत्पादक यांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना याविषयावर मच्छिमारांचे नेते वासुदेव सुरजुसे, पाणी तज्ञ मनिष राजनकर, नियोजन विषयक तज्ञ प्रविण मोते, जिल्हा मत्स्य उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जि.प.च्या माजी अध्यक्षा किसना भानारकर, आर्किटेक्ट खुशाल राखडे, अशोक पारधी व भक्तराज गजभिये यांनी विचार व्यक्त केले.प्रास्ताविक गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे यांनी केले. संचालन लक्ष्मीकांत तागडे यांनी तर आभार गुलाब मेश्राम यांनी मानले. यावेळी मत्स्य उत्पादक सहकारी संस्थेचे संचालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)