वैनगंगेत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:06+5:302021-06-10T04:24:06+5:30

भंडारा : वैनगंगा नदीत उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी येथील निर्वाण घाटावर उघडकीस आली. मंगळवारी सकाळपासून ...

Young man commits suicide by jumping into Waingang | वैनगंगेत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

वैनगंगेत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

भंडारा : वैनगंगा नदीत उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी येथील निर्वाण घाटावर उघडकीस आली. मंगळवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सकाळी तरंगताना आढळून आला.

हेमंत ऊर्फ डोना मधुकर हेडाऊ (३२) रा. तकीया वाॅर्ड भंडारा असे मृत तरुणाचे नाव आहे. तो जवाहरनगर आयुध निर्माणी कर्मचारी पतसंस्थेत नोकरीवर होता. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता ऑफीसला जातो असे म्हणून घरून निघाला. काही वेळानंतर त्याचा फोन बंद असल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. शोधाशोध सुरू झाली. सायंकाळी ६ वाजता त्याची दुचाकी आणि बॅग निर्वाण घाटाजवळ आढळून आली. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. सायंकाळी शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु उपयोग झाला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास हेमंतचा मृतदेह निर्वाण घाटावर वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळून आला. त्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे मात्र कळू शकले नाही. तो उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू होता.

Web Title: Young man commits suicide by jumping into Waingang