कांद्री येथ जागतिक महिला साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST2021-03-10T04:35:13+5:302021-03-10T04:35:13+5:30

जांब (लोहारा) : कांद्री येथे महिला काँग्रेस कमिटीतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतिजोती सावित्रीबाई फुले ...

World Women's Celebration at Kandri | कांद्री येथ जागतिक महिला साजरा

कांद्री येथ जागतिक महिला साजरा

जांब (लोहारा) : कांद्री येथे महिला काँग्रेस कमिटीतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी शिक्षिका तलमले तर उद्घाटक म्हणून मोहाडी (महिला) तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वर्षा बारई उपस्थित होत्या. अतिथी म्हणून मंगला बारई, विमल आकरे, शालिनी बारई, लक्ष्मीकांत देशमुख, कोमल आकरे, तानाबाई आकरे, भाग्यश्री कारेमोरे, मीनाक्षी भोंगाडे, छाया कारेमोरे, सिंधू हटवार, चंदा हटवार, अश्विनी बारई या होत्या. कांद्री आशा सेविका सीमाताई भासगवरे यांनी कोरोना सारख्या महामारीमध्ये एकूण ४० लोकांची नोंद करून उत्कृष्ट कामगिरी केली. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार कोमलताई आकरे यांनी केले.

Web Title: World Women's Celebration at Kandri