शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक करताहेत कारकुनाची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:01 IST

जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये चार वर्षांपासून लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांमधील

मोहाडी : जिल्ह्यातील खासगी शाळांमध्ये चार वर्षांपासून लिपिकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रिक्त पदे असलेल्या खासगी शाळांमधील मुख्याध्यापकांना कारकुनाची सर्व कामे करावी लागत आहेत.महाराष्ट्र शासनाने शिक्षक व लिपिकांची पदे भरण्यावर बंदी आणली आहे. तथापि शिक्षक भरतीवर काही अंशी बंदी उठविण्यात आली असली तरी शिक्षकांची पदे भरता येत नाही. शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरत आहेत. त्यांचा समायोजनाचा प्रश्न सुटेपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया सध्यातरी पुर्णपणे बंद आहे. मात्र दुसरीकडे चतुर्थश्रेणी कर्मचारी लिपिक व शिपाई यांची पदे मागील चार वर्षांपासून रिक्त पडलेली आहेत. भंडारा जिल्ह्यात लिपीक / शिपाई कोणत्याच शाळांमध्ये अतिरिक्त नाही. उलट २७ खासगी शाळेत लिपिकाची व एका खासगी शाळेत शिपायाचे पद रिक्त पडलेले आहेत. मात्र शासनाने लिपीक, शिपाई पदे भरण्यासाठी काहीएक पावले उचलली नाही. मागील महिन्यात शिक्षक संचालकांनी लिपीक / शिपाई रिक्त पदाची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांना मागविली होती, हे येथे उल्लेखनीय. जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्य.) भंडारा यांनी शिक्षण संचालकांना लिपिक / शिपाई रिक्त पदांची माहिती दिली आहे. शासन स्तरावर अजून काही निर्णय झाला नसल्याचे समजते.खासगी शाळांमध्ये लिपिक संवर्गाची रिक्त पदे असल्याने लिपिकाच्या कामाचा भार मुख्याध्यापकांवर येवून पडला आहे. मुख्याध्यापकांवर आधीच कामाचा बोजा अधिक आहे. तो बोजा सांभाळीत असताना लिपिकाची सर्व कामे त्यानांच पार पाडावी लागतात. शाळेचे प्रशासननिक कामे अद्यायवत ठेवणे, अध्यापन करणे, हेही कामे लागलीच आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांना मानसिक ताणातून जावे लागत आहे. लिपीक / शिपाई पदाची रिक्त पदे शासनाने भरावीत अशी मागणी विदर्भ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय भुरे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)