तुमसरमध्ये आमदारांच्या अटकेसाठी महिलांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:00 IST2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:44+5:30

तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील मातोश्री सभागृहासमोर एकत्र आल्या.

Women's silent march for the arrest of MLAs in Tumsar | तुमसरमध्ये आमदारांच्या अटकेसाठी महिलांचा मूक मोर्चा

तुमसरमध्ये आमदारांच्या अटकेसाठी महिलांचा मूक मोर्चा

ठळक मुद्देएसपींना निवेदन : पोलीस ठाण्यावर धडकल्या महिला

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : महिला पोलीस उपनिरीक्षकाचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल असलेले भाजपा आमदार चरण वाघमारे यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी तुमसर येथे महिलांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.
तुमसरचे भाजपा आमदार चरण वाघमारे यांच्यासह भाजप शहर अध्यक्ष अनील जिभकाटे यांच्यावर बुधवारी तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही त्यांना अटक करण्यात आली नाही. त्यांच्या अटकेची मागणी करीत तुमसर शहरातील महिला स्वयंस्फूर्तीने येथील मातोश्री सभागृहासमोर एकत्र आल्या. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सहभागी झाले. शहरातील मार्गावरून भ्रमण करीत हा मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहचला. तेथे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार अनील बावनकर, विजय डेकाटे, राजू कारेमोरे, राजकुमार माटे, डॉ.पंकज कारेमोरे, माधव बांते, प्रमोद तितीरमारे, रमेश पारधी, सीमा भुरे, कुंदा वैद्य, पमा ठाकूर, नैनश्री येळणे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women's silent march for the arrest of MLAs in Tumsar

टॅग्स :Morchaमोर्चा