स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST2021-03-10T04:35:08+5:302021-03-10T04:35:08+5:30

भंडारा : स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी क्रीडा संकुल भंडारा येथे मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सह ...

Women's Day celebrated by Sports Development Foundation | स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे महिला दिन साजरा

स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे महिला दिन साजरा

भंडारा : स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजी क्रीडा संकुल भंडारा येथे मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सह नियोजन अधिकारी फडके, सूर्यकांत इलमे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा खेळाडूंना कोरोना संसर्गातून कशाप्रकारे स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवता येईल याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले.

या फाउंडेशनचा उद्देश फक्त आणि फक्त खेळाडूंना कशाप्रकारे मदत करता येईल त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जिल्ह्याचे नावलौकिक कसे करता येईल याचे मार्गदर्शन करण्यात येते. कार्यक्रमाला प्रकाश सिंग, राजेश गेडाम, सतीश पॉल,सुनील खिलोटे, नितेश मोगरे, अरुण बांडेबुचे, बेणीलाल चौधरी, पंकज सार्वे, शिवराम पडोळे, प्रशांत घाटबांधे, विजय तायडे, सुशील वाघमारे, श्याम देशमुख, राकेश सुखदेवे व महिला खेळाडू उपस्थित होते.

Web Title: Women's Day celebrated by Sports Development Foundation