महिलांनी स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST2021-03-13T05:04:35+5:302021-03-13T05:04:35+5:30

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कौटुंबिक न्यायालय भंडारा व जिल्हा माहिला बालविकास कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी ...

Women should learn to make their own decisions | महिलांनी स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकावे

महिलांनी स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकावे

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कौटुंबिक न्यायालय भंडारा व जिल्हा माहिला बालविकास कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा येथे जागतिक महिला दिवस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय अनिता शर्मा, जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एच. कर्वे, सह दिवाणी न्यायाधीश डी.जे. एडाईत, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश एस.पी. भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न. के. वाळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, अधिवक्ता मंजूषा गायधने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न. के. वाळके यांनी केले. शिक्षणच स्त्री उध्दाराचे व समाजपरिवर्तनाचे साधन आहे म्हणून मुलींना शिक्षण देणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई योजना व मनोधैर्य योजना याबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय विधी सल्लागार अमिता खोब्रागडे यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या अधिनियमाबाबत तसेच विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केले. अधिवक्ता मंजूषा गायधने यांनी हुंडा प्रतिबंध अधिनियम तसेच महिलांची कामाच्या ठिकाणावर होणारी लैंगिक पिळवणूक अधिनियम याबाबत मार्गदर्शन केले.

अनिता शर्मा यांनी महिलांना सन्मान देणे हाच नारीशक्तीचा आदर आहे. महिलांचा फक्त आठ मार्चलाच आदर न करता प्रत्येक दिवशी नारीशक्तीचा आदर करायला पाहिजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता नेहा गजभिये यांनी तर, आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी केले. कार्यक्रमात जवळपास जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, बाल कल्याण समिती, चाईल्डलाईन तसेच भरोसा सेलचे अधिकारी कर्मचारी तसेच विधी स्वयंसेवक उपस्थित होते.

Web Title: Women should learn to make their own decisions