शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराविरूद्ध महिलांनी नि:संकोचपणे तक्रारी कराव्यात

By admin | Updated: December 6, 2014 22:41 IST

आपल्या संस्कृतीत पुरूषांनी असे वागावे, असे वागू नये असे संस्कार बालपणापासून होत असतात. त्याच परिणामामुळे महिलांना दुय्यम लेखणारी पुरूषी मानसिकता तयार होते. यातूनच महिलांवर लैंगिक

भंडारा : आपल्या संस्कृतीत पुरूषांनी असे वागावे, असे वागू नये असे संस्कार बालपणापासून होत असतात. त्याच परिणामामुळे महिलांना दुय्यम लेखणारी पुरूषी मानसिकता तयार होते. यातूनच महिलांवर लैंगिक अत्याचार व त्यांचे शोषण होत असते. त्यामुळे महिलांना या जाचातून न्याय मिळवून देणारा कायदा केंद्र शासनाने पारित केला आहे. त्याचा वापर करून् महिलांनी लैंगिक अत्याचार व शोषणाविरूद्ध नि:संकोचपणे तक्रारी कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले आहे.
महिलांवर होणारे अत्याचार आणि सुरक्षा याबाबत आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेला न्यायाधीश आर.व्ही. डफरे, एम.एम. अलोणे, अ‍ॅड. मंजुषा गायधनी, मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. सुहास गजभिये, आर्ट आॅफ लिव्हींगच्या प्रशिक्षक हेमांगी देशमुख, युवा रूरल असोसिएशनच्या समुपदेशक मृणाल मुनीश्वर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, उपजिल्हाधिकारी विजया बनकर उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. खोडे म्हणाल्या, अनेकदा कामाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होते. तक्रार कुणाकडे करायची. अधिकारी पुरूष असल्यामुळे न्याय मिळण्याची खात्री महिलांना नसते. म्हणूनच महिलांचे लैगिंक अत्याचार २०१३ हा कायदा झाल्यामुळे महिलांना अत्याचाराविरूद्ध न्याय मिळू शकतो, असे सांगून या कायद्यानुसार भंडारा जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या अध्यक्षतेत ही समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी दबावात न येता समितीकडे तक्रार करावी, अशीच कार्यशाळा पुरूषांसाठी सुद्धा घेण्यात येईल आणि या कायद्याविषयी त्यांच्यामध्येसुद्धा जाणीवजागृती करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी अ‍ॅड. मंजुषा गायधनी म्हणाल्या, महिलांनी सतर्क असायला हवे. कायदा हा घटना घडून गेल्यावर वापरला जातो. मात्र घटना घडू नये यासाठी महिलांनी सतर्क असावे. महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे आवश्यक झाले आहे.
मृणाल मुनीश्वर म्हणाल्या, महिलांनी महिलांनी स्वत:वरील अत्याचार कधीच सहन करू नये. स्वसंरक्षणाचे काही उपाय यावेळी सांगितले. तसेच स्वानुभवाद्वारे महिलांना मार्गदर्शन केले. आॅर्ट आॅफ लिव्हींगच्या हेमांगी देशमुख यांनी हिंदू संस्कृतीत महिलांचे स्थान नेहमीच उच्च ठेवले आहे. स्त्रीला शक्ती स्वरूप संबोधले जाते. त्यामुळे महिलांनी स्वत:वरील शक्तीला जागृत करावे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे आणि शिक्षणाधिकारी सुवर्णलता घोडेस्वार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्दीष्ट उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)