शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी उधळला ग्रामपंचायतीचा डाव

By admin | Updated: June 7, 2015 00:46 IST

गावातील दारुचे दुकाने गावाबाहेर नेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला होता.

अड्याळ येथील प्रकार : देशी दारु दुकान हटविण्याचे प्रकरणअड्याळ : गावातील दारुचे दुकाने गावाबाहेर नेण्याचा ग्रामपंचायतीने ठराव घेतलेला होता. मात्र मद्यसम्राटाच्या मोहामुळे तो ठराव रद्दबादल ठरवून दारुच्या दुकानाला गावात परवानगी देण्याचा घाट ग्रामपंचायतीने रचला. ही बाब महिलांना माहिती होताच त्यांनी ग्रामपंचायतीने बोलाविलेल्या विशेष सभेत हाणून पाडला. हा प्रकार अड्याळ येथे सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे.पवनी तालुक्यातील राज्य मार्गावर वसलेल्या अड्याळ येथे देशी दारु, बियरबारची दुकाने आहेत. या दुकानांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गावातील दारुची दुकाने किमान १ कि.मी. दूर न्यावे असा अड्याळ ग्रामपंचायतीने २२ मे २०१४ ला सर्वसंमतीने ठराव पारित केला होता. त्या ठरावानुसार कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र माशी कुठे शिंकली कुणालाच कळले नाही. एका मद्यसम्राटाने दिलेल्या आश्वासनामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने वर्षभरापूर्वी घेतलेला ठराव रद्द करून त्या दुकानमालकाच्या दुकानाला गावात दुकान सुरु करण्याची परवानगी देण्याचा घाट रचला. या संबंधात ग्रामपंचायतीने एका विशेष सभेचे आयोजन केले होते. दरम्यान ही बाब गावातील महिलांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायतीचा हा घाट रद्द करण्याच्या दृष्टीने जनजागृती केली. सभेच्या दिवशी महिलावर्ग सभेला उपस्थित राहू नये या दृष्टीने रोजगार हमी योजनेची कामे नेमके त्याच दिवशी सुरु करण्यात आली. मात्र दारु दुकान गावाबाहेर हटविण्याबाबत महिलांनी चंग बांधल्याने रोहयोच्या मधल्या सुटीत महिलांनी ग्रामपंचायतमध्ये धडक मारली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये आशा वर्करच्या निवडीबाबत चर्चा सुरु होती. ती चर्चा व दारुच्या दुकानाला परवानगी देण्यात यावी याबाबत चर्चा करून त्यावर मते नोंदविण्यात आली. यात ६० ते ७० उपस्थित महिलांनी ग्रामपंचायतीच्या मनसुब्यावर पाणी फेरले. त्यांनी दारु दुकान गावात राहू नये असा ठराव सर्व संमतीने पारित केला. यामुळे मद्यविक्रेत्यांचे बांधलेले मनसुबे धुळीस मिळाले. एकंदरीत या प्रकाराबाबत ग्रामपंचायतीच्या सरपंचा रजनी धारणे व ग्रामविकास अधिकारी शामराव नागदेवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. (वार्ताहर)