शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळात जिल्ह्याची वर्णी लागणार का?

By admin | Updated: October 28, 2014 22:52 IST

१५ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात सरकार आले आहे. भाजपाच्या नवीन सरकारमध्ये भंडारा जिल्ह्यातून एक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

भंडारा : १५ वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात सरकार आले आहे. भाजपाच्या नवीन सरकारमध्ये भंडारा जिल्ह्यातून एक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा भाजपाने दारून पराभव केला. नरेंद्र मोदींच्या लाटेत भंडारा - गोंदिया जिल्ह्यात विकासाची कामे खेचून आणणारे तत्कालीन केंद्रीय मंत्री खा.प्रफुल पटेल यांना मतदारांनी नाकारले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपाने विदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य पक्षांचा सफाया केला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या तिनही विधानसभा क्षेत्रात भाजपाचेच उमेदवार निवडून आले. त्यामुळे मोदींची लाट ओसरायला लागली, असे म्हणणाऱ्यांवर डोक्यावर हाथ मारण्याची वेळ आली आहे. भंडारा जिल्ह्यात पूर्वी तुमसर व भंडारा विधानसभा क्षेत्रात मधुकर कुकडे व राम आस्वले यांनी हॅट्रीक केली होती. त्यांच्या पक्षवाढीचा लाभ भाजपाच्या उमेदवारांना झाला. आज भंडारा जिल्हा भाजपमय झाला आहे. १५ वर्ष सातत्य राखणाऱ्या आमदारांना मंत्री होता आले नाही, याचे शल्य मतदारांना आहे. मतदारांनी भाजपाचे सरकार आल्यामुळे जिल्ह्यातील तीन आमदारापैकी कोणाच्यातरी नशिबात मंत्रीपद येईल, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. आजघडीला जिल्ह्यात भाजपाचे मंत्री, कोण बनणार यापेक्षा भंडारा जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार कां? याची आशा बाळगून असणारे अधिक आहेत. बघुया तीनपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते ते. (जिल्हा प्रतिनिधी)