पटसंख्येअभावी भंडारा जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्र पडणार बंद ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:26 IST2025-09-03T18:24:40+5:302025-09-03T18:26:47+5:30
Bhandara : निकष पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाची धावपळ

Will 24 examination centers in Bhandara district be closed due to lack of number of candidates?
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : परीक्षा केंद्र मंजुरीसाठी आवश्यक किमान विद्यार्थीसंख्या, पायाभूत सुविधा अशा काही निकषांची पूर्तता होत नसल्याने जिल्ह्यातील इयत्ता दहावीची १५ तर बारावीची ९ परीक्षा केंद्रे बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांपूर्वी जिल्ह्यातील तब्बल २४ परीक्षा केंद्रांवर संकट ओढवले आहे. निकषांनुसार विद्यार्थीसंख्या अपुरी असल्याने आणि केंद्रासाठी आवश्यक अटींची पूर्तता न झाल्याने दहावीच्या १५ व बारावीच्या ९ परीक्षा केंद्रांना मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नागपूर विभागीय मंडळाचे सचिव रवींद्र सोनटक्के यांनी ही नोटीस संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. परीक्षा केंद्र सुरू ठेवण्यासाठी मंडळाने ठरवून दिलेल्या निकषांचे पालन न झाल्याचे नमूद आहे. या केंद्रांबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ३ सप्टेंबर रोजी विभागीय मंडळात सुनावणी होणार आहे.
हे आहेत निकष
विद्यार्थी संख्या १० वी १२ वी
शहरी भाग २०० २५०
ग्रामीण भाग १२५ १५०
अति दुर्गम भाग १०० १२५