शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट रेती ट्रकने वन्यजीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा अभयारण्यांतर्गत कोका अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. १०० चौरस किलोमीटर मध्ये असलेल्या या अभयारण्यातून तुमसर-साकोली हा राज्यमार्ग आणि लाखनी मार्ग जातो. अभयारण्याच्या निर्मितीपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आल्याने तो पूर्णत: डांबरी आहे. या अभयारण्यालगत वैनगंगेचे मुंढरी आणि निलज घाट आहे.

ठळक मुद्देकोका अभयारण्यातील प्रकार : वेग मर्यादेचे उल्लंघन, टीपीवरील मार्गाला दिली जाते तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रेतीतस्करांनी धुमाकुळ घातला असून आता चक्क अभयारण्यातून रेतीचे ट्रक सुसाट धावत आहेत. यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. कोका अभयारण्यात नियमांचे उल्लंघन करून वेग मर्यादाही पाळली जात नाही. टीपीवरील मार्ग बदलून अभयारण्यातील जवळच्या मार्गावरून रेतीची वाहतूक बिनबोभाट सुरु आहे. वनविभागाचे अधिकारी यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असले तरी महसूल विभागाचे त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही.भंडारा जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा अभयारण्यांतर्गत कोका अभयारण्य आहे. या अभयारण्याची स्थापना १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. १०० चौरस किलोमीटर मध्ये असलेल्या या अभयारण्यातून तुमसर-साकोली हा राज्यमार्ग आणि लाखनी मार्ग जातो. अभयारण्याच्या निर्मितीपूर्वी हा रस्ता तयार करण्यात आल्याने तो पूर्णत: डांबरी आहे. या अभयारण्यालगत वैनगंगेचे मुंढरी आणि निलज घाट आहे. या घाटातून रेतीची अहोरात्र वाहतूक सुरु असते. त्यासाठी वाहनासाठी टीपी घेतली जाते. मात्र टीपीवर असलेला रस्ता सोडून जवळचा रस्ता म्हणून अभयारण्यातील रस्त्याचा उपयोग वाहनचालक सर्रास करतात. अभयारण्याच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव रेती टिप्पर धावताना दिसतात.अभयारण्यातून जाणाऱ्या वाहनांसाठी २० किलोमीटर प्रती तास अशी वेगमर्यादा आहे. कोणत्याही प्रकारचा हॉर्न वाजविता येत नाही. मात्र रेतीचे ट्रक पैसे मिळविण्याच्या नादात ६० ते ७० किलोमीटर प्रतीतास वेगाने धावताना दिसून येतात.अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, कोल्हे, चांदीअस्वल, रानगवे यासह विविध तृणभक्षी प्राणी आहेत. नैसर्गिक अधिवास असलेल्या या अभयारण्यात या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. चारा आणि पाण्याच्या शोधात प्राणी रस्ता ओलांडतात, परंतु भरधाव वाहतुकीमुळे या प्राण्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कर्णकर्कश हॉर्नमुळे प्राणी रस्ता ओलांडत नाहीत. अनेकदा एका पाठोपाठ एक वाहने धावत असल्याने अपघाताचीही भीती असते. वन्यजीव विभागात कोका अभयारण्यात ठिकठिकाणी तपासणी नाके लावले आहेत. त्या ठिकाणी असलेल्या रजिस्टरवर नोंद करूनच वाहनांना पुढे जाता येते. रेतीच्या ट्रकबाबत वन्यजीव विभागाने कठोर पावले उचलली आहेत. रात्रीच्या वेळी या वाहनांना येथून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु दिवसभर रेतीचे ट्रक अहोरात्र धावताना दिसतात. महसूल विभागाने याबाबत ठोस कारवाई करण्यासाठी वन्यजीव विभागाला सहकार्य करणे अपेक्षित आहे.नियमांच्या फलकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षवन्यजीव विभागाने ठिकठिकाणी नियमांचे फलक लावले आहेत. या फलकावर विविध सूचना लिहिल्या आहेत. परंतु या सूचनांकडे टिप्पर चालकच नव्हे तर या भागातून धावणारे सर्वच वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत. वाहने हळू चालवा, वन्यप्राण्यांना वाचवा, हॉर्न वाजवू नका असे ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. परंतु सर्व नियम पायदळी तुडवत या अभयारण्यातून वाहतूक केली जाते. यातून वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे.दिवसभरात धावतात १५ ते २० रेतीचे टिप्परमुंढरी आणि निलज घाटावरून रेती भरून येणारे ट्रक कोका अभयारण्यातून धावतात. दिवसभरात साधारणत: १५ ते २० रेतीचे अवजड ट्रक जातात. याबाबत तपासणी नाक्यावर त्याची नोंदही केली जाते. येथे रितसर टीपी बघितल्या जाते. परंतु अनेकदा टीपी बनावट राहण्याचीही शक्यता असते. साधारणत: सकाळी ६ वाजतापासून ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत रेतीचे ट्रक धावतात. यासोबतच मॅग्नीज आणि गिट्टी भरलेले ट्रकही याच मार्गावरून जाताना दिसून येतात.महसूल विभागाचे असहकार्यरेती तस्करी हा विषय महसूल विभागाच्या अखत्यारीतील आहे. मात्र अभयारण्याच्या हद्दीतून वाहतूक होते. याबाबत वन्यजीव विभागाने वारंवार महसूल विभागाला सूचनाही दिली आहे. परंतु कोणताही परिणाम दिसत नाही. अनेकदा वन्यजीव विभागच रेती टिप्परवर कारवाई करते. रेतीचे ढिग रस्त्यावर सोडून टिप्परचालक तेथून निघून जातात. आक्रमक टिप्पर चालकांपुढे वनकर्मचारी कमी पडत असल्याचे येथे दिसून येते.तुमसर ते साकोली, खडकी ते भिलेवाडा, कोका ते टेकेपार, दुधारा ते सुरेवाडा या रस्त्यावरून रेतीची वाहतूक सुरु असते. या भरधाव वाहतुकीमुळे वन्यजीव वाहनाखाली येण्याची कायम भीती असते. परंतु याबाबत चालकांना सोयरसुतक नसते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी