बिबट्याच्या कातडीचा सौदा करणारे नागपूरचे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 05:00 AM2020-07-05T05:00:00+5:302020-07-05T05:00:55+5:30

तालुक्यातील खैरी पिंडकेपार येथे तीन महिन्यापूर्वी शेत कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेची कुणालाही खबरबात नव्हती. दरम्यान आरोपींनी या कातड्यासाठी ग्राहकाचा शोध सुरु झाला. नागपुरच्या व्यक्तीशी संपर्क सुरु झाला. या शिकाऱ्यांनी कातडीची किंमत २० कोटी रुपये सांगितली होती. दरम्यान हा सौदा पाच लाख रुपयात झालाही होता.

Who from Nagpur sells leopard skin? | बिबट्याच्या कातडीचा सौदा करणारे नागपूरचे कोण?

बिबट्याच्या कातडीचा सौदा करणारे नागपूरचे कोण?

Next
ठळक मुद्देचौकशी कासवगतीने : साकोलीच्या खैरी पिंडकेपारचे प्रकरण

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : बिबट्याची शिकार करून कातडी विकण्याच्या प्रयत्नात जेरबंद झालेल्या सहा जणांनी नागपुरच्या व्यक्तीसोबत पाच कोटी रुपयात सौदा केला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा हा बेत हाणून पाडला. आता एवढ्या मोठ्या किमतीत बिबट्याचे कातडे खरेदी करणारे नागपुरचे ते कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांकडून हा तपास वनविभगाकडे गेल्याने अतिशय संथ गतीने सुरु आहे.
तालुक्यातील खैरी पिंडकेपार येथे तीन महिन्यापूर्वी शेत कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या घटनेची कुणालाही खबरबात नव्हती. दरम्यान आरोपींनी या कातड्यासाठी ग्राहकाचा शोध सुरु झाला. नागपुरच्या व्यक्तीशी संपर्क सुरु झाला. या शिकाऱ्यांनी कातडीची किंमत २० कोटी रुपये सांगितली होती. दरम्यान हा सौदा पाच लाख रुपयात झालाही होता. परंतु स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांना गोपनीय खबर मिळाली. त्यांनी वेशांतर करून आणि सापळा रचून सहा जणांना जेरबंद केले. यानंतर या प्रकरणाचा तपास वनविभागाकडे देण्यात आला.
वनविभागाने या सहा जणांची वन कोठडी मिळविली आहे. मात्र तीन दिवसात तपास पुढे सरकला नाही. शिकाऱ्यांनी नागपुरच्या व्यक्तींशी संपर्क साधला होता. मोबाईलवरूनच त्यांनी संपर्क साधला असावा त्यामुळे आरोपींचे मोबाईलचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. पाच कोटी रुपयात कातडे खरेदी करणारे व्यक्ती गर्भश्रीमंत असण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या टोळीसाठी ही मंडळी काम करीत असावी असा संशय आहे.

बिबट्याच्या नखांचा थांगपत्ता नाही
शिकाºयांजवळून पोलिसांनी बिबट्याची कातडी, जबडा जप्त केला. मात्र अद्यापही बिबट्याच्या नखांचा थांगपत्ता नाही. या नखांची विक्री तर झाली नाही ना अशा संशयही व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे शिकार नेमकी कोणत्या ठिकाणी झाली. याचा तीन दिवसात उलगडा करता आला नाही. सहाही आरोपी १५ जुलैपर्यंत वन कोठडीत आहेत. मात्र तीन दिवसात त्यांच्याकडून पुरेशी माहिती घेण्यास वनविभागाला यश आले नाही. तसेच यापुर्वी त्यांनी कुठे शिकार केली का? याचाही शोध घेण्याची गरज आहे.

Web Title: Who from Nagpur sells leopard skin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.