शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

कुठे कार्यकर्त्यांची लगबग; कुठे सभांचे नियोजन

By admin | Updated: October 11, 2014 22:59 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण मतदारसंघातील प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी विविध पक्ष कार्यालयात सध्या लगबग सुरू आहे. विरोधकांचे नेमके काय चालले आहे

भंडारा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. संपूर्ण मतदारसंघातील प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी विविध पक्ष कार्यालयात सध्या लगबग सुरू आहे. विरोधकांचे नेमके काय चालले आहे आणि त्यांना शह देण्यासाठी काय करता येईल, याची खलबते पक्ष कार्यालयातील बंद खोलीत होऊ लागली आहेत. दिवसभराच्या नियोजनासोबतच कार्यकर्त्यांशी संपर्क आणि रॅली आणि कॉर्नर बैठकांच्या नियोजनात कारभारी व्यस्त आहेत.सर्व पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचार मोहिमेवर निघण्याची लगबग सकाळी १० वाजता सुरू होती तर काही कार्यकर्ते कॉर्नर बैठका, मेळावे, सभा याच्या आयोजनात दंग असल्याचे चित्र पहावयास मिळाले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा राबता या कार्यालयात असल्याचे पहायला मिळाले.भंडारा शहरातील सर्वच पक्ष कार्यालयात दुपारी पाहणी केली. यावेळी येथे ५०-६० कार्यकर्ते दिसून आले. यातील काही कार्यकर्ते गाद्यांवर लेटले होते तर बाहेर गावाहून आलेले कार्यकर्ते प्रचार प्रमुख आपल्याला केव्हा वाहन देतात आणि आपण कधी एकदाचे प्रचार मोहिमेवर निघतो याची वाट पहात कार्यकर्ते बसले होते. आपल्या गाडीत कोण कोण असणार, याचेही नियोजन कार्यकर्त्यांमध्ये चालले होते.शहरातील कॉर्नर बैठकांना हजर राहा म्हणून प्रचार प्रमुख कार्यकर्त्यांना सांगत होते. कोणत्या गावात कॉर्नर बैठका घ्यायच्या याबाबतही नियोजन सुरू होते. पुढील दोन दिवस मतदारसंघात घेण्यात येणाऱ्या सभांचे नियोजन पहिल्या फळीतील कार्यकर्ते करीत होते. कुठल्या गावांना वाहने पाठवून कार्यकर्ते गोळा करायचे. गावागावातील कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून संपर्क करून सभांना, मेळाव्यांना, प्रचारफेऱ्यांना हजर राहण्याबाबतही विनंती केली जात होती. तर काही कार्यकर्त्यांवर पॉम्प्लेट वाटण्याची जबाबदारी दिली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रचारफेऱ्यांचे नियोजन करताना काही कार्यकर्ते या कार्यालयावर आढळून आले. याकरिता सकाळच्यावेळी सर्वच पक्षाच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली दिसून येते. प्रचाराच्या दिवसांचे महत्व जाणत तर कामाव्यतिरिक्त अधिक वेळ कार्यकर्त्यांना संपर्क कार्यालयात बसू ही दिले जात नाही. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या सत्रात मतदार संघात प्रचारफेऱ्या, बैठका, रॅलीचे आयोजन केले जात आहे. कार्यकर्त्यांचे सर्व सोय करीत कार्यालयाच्या परिसरातच जेवणाच्या पंगती उठत आहेत.कार्यकर्त्यांची चलतीनिवडणुकांव्यतिरिक्त इतरवेळी दुरावलेल्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान महत्व आले असल्याचे दिसत आहे. कार्यालयाच्या परिसरातच जेवणावळी उठत आहेत. नाराज कार्यकर्त्यांच्या परिसरातच जेवणावळी उठत आहेत. नाराज कार्यकर्त्यांच्या मनधरणीसाठी उमेदवारांकडूनच प्रयत्न केले जात आहेत. कार्यकर्ता दुरावून मतदारावर त्याचा परिणाम होऊ नये याकरिता तुमच्यासाठी काय पण, असे म्हणत कार्यकर्त्यांची कोणतीही मागणी मान्य केली जात आहे. सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांच्या मोबाईलसाठी प्रचार करणारी रिंगटोनही डाऊनलोड करून दिली जात आहे. (प्रतिनिधी)