शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन केव्हा होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:10 IST

उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

लोखंडी पाट्या चोरीला : जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना अच्छे दिनची प्रतीक्षाराजू बांते मोहाडी उन्हाळ्यात पाण्यासाठी ओरड होत असते. ग्रामीण भागात नाला व नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला युतीच्या कार्यकाळात अच्छे दिन येतील का असा प्रश्न आहे.जलयुक्त शिवार अभियान ही युती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यातून पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. तथापि, कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतीला पाणी मिळावे या उद्देशाने गावातून वाहणाऱ्या नदी नाल्यावर बंधाऱ्याची संकल्पना मांडण्यात आली होती. गावोगावी मोठ्या प्रमाणात बंधारे बांधले गेले होते. २००१ ते २००५ या वर्षात कोल्हापुरी बंधारे बांधले गेले. बंधाऱ्यातून पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी मदत होईल, असा हेतू होता. कालांतराने मोहाडी तालुक्यातील कान्हळगाव, सिरसोली, मोहाडी, दहेगाव येथे ३२ ठिकाणी बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेले हे बंधारे निकामी पडले आहेत. कान्हळगाव (सिरसोली) येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेट्स चोरीला गेले. पाच वर्षापूर्वी याच बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला. परंतु पाणी ‘ना अडले - ना जमिनीत जिरले’. जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून जुन्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र बांधलेले कोल्हापुरी बंधारे क्षुल्लक किमतीच्या लोखंडी प्लेटअभावी दुरुस्तीची वाट बघत आहेत. शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी जुन्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रशासनाने मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मात्र नवीन बंधारे बांधण्यासाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोल्हापुरी बंधाऱ्याची डागडुजी केल्यास उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. उन्हाळ्यात नद्या कोरड्या पडतात. अशावेळी जनावरांना पाण्यासाठी भटकावे लागते. बंधाऱ्यात पाणी थांबले तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते.१५ गावांची निवडजलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी मोहाडी तालुक्यातील महालगाव, धोप, आधळगाव, डोंगरगाव, पालडोंगरी, चिचोली, नवेगाव, ताडगाव, जांब, हिवरा या दहा गावांचा समावे, करण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षात १५ गावांची निवड करण्यात आली होती.