शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?

By admin | Updated: September 1, 2015 00:33 IST

देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

नियमांची ऐसीतैसी : ५0 मायक्रॉन पॉलिथिन सहजपणे उपलब्धभंडारा : देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर भंडारासुद्धा पॉलिबॅग मुक्त व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. राज्य सरकारने २००६ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगची निर्मिती, विक्री आणि उपयोगावर प्रतिबंध लावण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणीही झाली. ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगमध्ये ग्राहकांना वस्तू देत असल्याचे बाजारात चित्र आहे. राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅग निर्मितीवर प्रतिबंध असतानाही बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅग कुठून येतात, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. याबाबत चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तसेच कायद्याचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे. (प्रतिनिधी)पॉलिथिन खाल्ल्याने जनावरांचा मृत्यूप्रदूषण नियंत्रणावर काम करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर संस्थेचे अभियान सुरू आहे. कमी जाडीचे पॉलिबॅग खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये विशेषत: गायी मृत्युमुखी पडतात. पॉलिथिनमुळे नाल्या तुंबल्यानंतर मुंबईत पूर आला होता. शहरात मोठी दुकाने वगळता सुमारे ६० टक्के छोटे दुकानदार व हातठेल्यांवर आतासुद्धा ५० मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या प्लॅस्टिक बॅगचा वापर धडाक्यात सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. लेह लडाखपासून धडा घ्यावालेह लडाख दीड दशकाआधीच पॉलिथिन बॅगमुक्त झाला आहे. तेथील लोक नमूद केलेल्या जागेवरच बॅग फेकतात.बॅगचा साठा लेह व लडाखच्या बाहेर नेला जातो. त्यांच्यापासून धडा घेण्याची गरज आहे. नाल्याचा प्रवाह प्रभावित५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅगचे पुनर्चक्रण होऊ शकत नाही. या बॅग नदी, तलाव, नाल्यांमध्ये फेकल्यामुळे पाणी प्रदूषित होते. नाल्याचा प्रवाह प्रभावित होतो. अशा स्थितीत नागरिकांनी कमी जाडीच्या बॅगचा उपयोग करू नये. त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कापडी थैल्यांचा अधिकाधिक उपयोग करावा.प्रदूषणमुक्त होण्यात सहभागी व्हापॉलिथिन बॅगचा तुम्ही उपयोग करीत असल्यास प्रदूषण वाढविण्यात तुमचाही तेवढाच सहभाग आहे. नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा जाड पॉलिबॅगचा उपयोग करा. खरेदीसाठी कापडाची थैली सोबत न्यावी. प्रदूषणमुक्त शहर बनविण्यात तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता.