वैनगंगा नदी पात्रातील चमकदार दगडांचे रहस्य काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:42+5:30

मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड येथे आहेत. अनेक पूर या दगडांवरुन गेले आहे.

What is the secret of the glowing stones in the Wainganga River basin? | वैनगंगा नदी पात्रातील चमकदार दगडांचे रहस्य काय?

वैनगंगा नदी पात्रातील चमकदार दगडांचे रहस्य काय?

googlenewsNext
ठळक मुद्देमांडवीतील प्रकार : १५० मीटर परिसरात प्राचीन दगडांची रांग

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील मांडवी येथील वैनगंगेच्या विशाल पात्रात सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात प्राचीन काळ्या चमकदार दगडांची रांग आहे. काही दगड नदी काठावर आहेत. या दगडांनी पूराच्यावेळी गावाचे संरक्षण केले. भूगर्भ वैज्ञानिकांनी येथे दगडांची तपासणी व पाहणी केल्यास मोठी संशोधक माहिती मिळणार आहे.
मांडवी गाव वैनगंगेच्या नदी काठावर वसलेले आहे. गावापासून हाकेच्या अंतरावर नदीपात्र आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. नदीपात्रात काळे चमकदार दगड सुमारे १०० ते १५० मीटर परिसरात आहेत. सदर दगड साधे नाही एक विलक्षण चमक असून ते आकर्षक आहेत. शेकडो वर्षापासून दगड येथे आहेत. अनेक पूर या दगडांवरुन गेले आहे. चमकदार दगडांचे रहस्य आजही कायम आहे.
काही दगड नदी काठापासून काही अंतरावर आहेत. पूर्वी वैनगंगेचे पात्र येथे विशाल असल्याचे संकेत या दगडामुळे येथे मिळते. काठावरील दगडही अत्यंत आकर्षक, मजबुत व चमकदार आहेत. पर्यावरणाचा शेकडो वर्षापासून त्यांचेवर काहीही परिणाम झाला नाही. प्रथम सदर दगड दुरुन धातूसारखे दिसतात.

भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी
मांडवी येथील दगड प्राचीन असून चमकदार आहेत. प्रथम दगडासारखा भासणारा हा धातू तर नाही. दगडाला इतके वर्ष झाल्यानंतरही चमक कशी आहे. हा सर्व सामान्यांकरिता कुतुहलाचा विषय ठरला आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांनी येथे प्रत्यक्ष पाहणी करुन निष्कर्ष काढण्याची गरज आहे. त्यामुळे अभ्यासकांना येथे संधी प्राप्त होईल.

पुरापासून बचाव
गाव तथा शहराला पूरापासून बचावाकरिता दगडांचा भरावासाठी उपयोग करतात. मांडवी गाव नदी काठावर आहे. नदी पात्रातील मजबुत, टणक दगडांनी निश्चितच पूरापासून बचाव केला आहे. सदर दगड आकर्षक आहेत.

Web Title: What is the secret of the glowing stones in the Wainganga River basin?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी