शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानपिकांना भारनियमनाचा फटका

By admin | Updated: April 24, 2017 00:55 IST

निवडणुकीच्या काळात स्वत:चे हित साध्य करण्यासाठी निवडणूकीत उभे असलेले उमेदवार विविध पोकळ आश्वासनाची फुसके बार सोडून,..

लोकप्रतिनिधींचे आश्वासन पोकळ : पंचभाई यांचा आंदोलनाचा इशाराचिचाळ : निवडणुकीच्या काळात स्वत:चे हित साध्य करण्यासाठी निवडणूकीत उभे असलेले उमेदवार विविध पोकळ आश्वासनाची फुसके बार सोडून, ‘आम्ही तुमच्यासाठी हे ते करु’ म्हणून मतांचा जोगवा मागतात. निवडून आल्यावर ते लोकप्रतिनिधी क्षेत्रात ढूंकूनही पाहत नसल्याची प्रचिती पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे. १६ तास विद्युत पुरवठा देण्याचे ठोस आश्वासन देवूनही आश्वासनाची पूर्तता न केल्याने बळीराजाची धान शेती धोक्यात आली आहे.अत्यल्प पावसामुळे खरीप धानशेती होरपळून निघाली. इतकेच नाही तर पावसाळयाच्या प्रारंभापासूनच पावसाने हुलकावणी दिल्याने निर्सगावर अवलंबून असणाऱ्या बळीराजाने तलाव, बोळीतील इंजिनद्वारे पाणी देवून रोवणी केली. कित्येक शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय नसल्याने त्यांची पऱ्हे शेतातच राहली होती. इतकेच नाही तर रब्बीतील कळधान्याच्या उत्पादनापासून शेतकरीवर्ग वंचित राहीला. निसर्गाची अवकृपा व दिर्घकालीन विद्युत भारनियमन यांचा धान शेतीवर जबर फटका बसला परिणामी खरीप हंगामातील शेतीच्या खर्चाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. भाजप शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितार्थ उन्हाळी धान पिकांना व बागायती पिकांना १६ तासाचा विद्युत पुरवठा मिळावा यासाठी भाजपा प्रणित साकोली, तुमसर व भंडारा क्षेत्रातील आमदारांनी आंदोलन पुकारले मात्र सदर आंदोलनाचे श्रेय साकोली क्षेत्राचे आमदार बाळा काशिवार यांनी श्रेय लाटून आपल्या क्षेत्रात १६ तासाचा विद्युत पुरवठा केला. भंडारा क्षेत्रातील आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी लालीपाप देण्यात आले. पवनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्यालाही १६ तपास विद्युत पुरवठा मिळेल ही आस ठेवून खरीपातील तुट भरुन काढण्याच्या हेतूने ज्यांचे कृषिपंप आहे. अशानी नव्यां उमेदीने नवीन जोखीम पत्कारून बागायती पिके व उन्हाळी धान शेती लागली. पवनी तालुक्यातील चिचाळ, कोंढा, भावड, सेंद्री, खैरी, भेंडाळा, पालोरा, आसगाव आदी गावाला चौरास म्हणून संबोधले जातो. मात्र तालुक्यात शहरी भागाला २४ तास विद्युत पुरवठा होत आहे. ज्यांचा शेतकऱ्यांना कोणताच लाभ होत नाही तर चौरास म्हणून शेती करणारा ग्रामीण भागात १२ तास सिंगल फेस व १२ तास थ्रि फेस विद्युत पुरवठा होत आहे. विद्युत विभागाच्या व लोकप्रतिनिधीच्या निर्दयी सेवेमुळे इथेई शेतकऱ्यांच्या अपेक्षा तडीस गेल्या.येथील कृषीपंपाना व गाववस्त्यांना २४ तासाताून केवळ १२ तास थ्री फेस विद्युत पुरवठा मिळतो. धान व बागयती पिकाच्या दृष्टीने हा कालावधी फारच कमी असल्याने सध्याच्या तापमानाने पिके होरपळून निघाली आहेत. सदर पिकांना १६ ते १८ तास विद्युत पुरवठा आवश्यक आहे. या विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अलीकडे गावांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेळसावू लागली. या सबंधाने संबधीतांनी मंत्री, खासदार, आमदार तसेच स्थानिक प्रतिनिधी यांना निवेदने देण्यात आली. प्रसंगी निदर्शनेही करण्यात आली. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितावह ठरेल अशी कोणतीही तडजोड अथवा कारवाही करण्यात आली नाही. धानपीकाला १६ तास विद्युत पुरवठा करण्याची मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे.(वार्ताहर)पवनी तालुक्यतील चौरास भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिचाळ, कोंढा, पालोरा, भेंडाळा, आसगाव, भावड, सेंद्री, ब्रम्ही आदी गावातील धान पीके गर्भालयात असून पाण्याअभावी धान पिके करपत असल्याने या चौरास भागाला १६ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा अन्यता आझाद शेतकरी संघाच्यावतीने तुतारी मोर्चा काढण्यात येईल.- किशोर पंचभाईअध्यक्ष, आझाद शेतकरी संघटना पवनी