वीकेंड लाॅकडाऊन कडकडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:34 IST2021-04-11T04:34:55+5:302021-04-11T04:34:55+5:30

वीकेंड लाॅकडाऊन असला तरी एसटी बस मात्र सुरू हाेती. त्यामुळे बसस्थानकावर काहीअंशी प्रवाशांची गर्दी दिसत हाेती. नियमित असणारे एसटीचे ...

Weekend lockdown tight | वीकेंड लाॅकडाऊन कडकडीत

वीकेंड लाॅकडाऊन कडकडीत

वीकेंड लाॅकडाऊन असला तरी एसटी बस मात्र सुरू हाेती. त्यामुळे बसस्थानकावर काहीअंशी प्रवाशांची गर्दी दिसत हाेती. नियमित असणारे एसटीचे शेडूल शनिवारी कमी करण्यात आले हाेते. भंडारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी लाॅकडाऊनला प्रतिसाद मिळाला. साकाेली पवनी, लाखनी, लाखांदूर, माेहाडी, तुमसर येथेही व्यापारी आणि नागरिकांनी बंद पाडून प्रशासनाला सहकार्य केले.

बाॅक्स

राष्ट्रीय महामार्गावर पाेलिसांची करडी नजर

भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दिवसभर पाेलिसांची करडी नजर हाेती. भंडारा लगतच्या धारगाव येथे पाेलिसांनी दुचाकीस्वारांना थांबवून त्यांची चाैकशी सुरू केली हाेती. येणाऱ्या प्रत्येकाला तंबीही दिली जात हाेती. पाेलीस केवळ दुचाकी चालकांचीच चाैकशी करीत असल्याचे दिसत हाेते.

बाॅक्स :

सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

शनिवारी पहिल्या दिवशी वीकेंड लाॅकडाऊनला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा लाॅकडाऊन दाेन दिवसांचा असून, रविवारीसुद्धा नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले. नगरपरिषदेचे पथक शहरभर गस्त घालून नागरिकांना सूचना देत हाेते.

Web Title: Weekend lockdown tight