शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा बार उडविला धूमधडाक्यात! चार वधुपित्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST

गोंदिया : लग्न म्हटले की आताही धामधूम होत आहे. लग्नसमारंभात जणू कोरोनाला निमंत्रण देण्याचे काम केले जात आहे. ...

गोंदिया : लग्न म्हटले की आताही धामधूम होत आहे. लग्नसमारंभात जणू कोरोनाला निमंत्रण देण्याचे काम केले जात आहे. परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ना कारवाईची भीती ना दंडाची भीती अशी स्थिती सद्यस्थितीत सुरू असलेल्या लग्नसमारंभातून दिसून येते. लग्नसमारंभात ५० पेक्षा जास्त संख्या नसावी असे जिल्हा प्रशासनाने पत्रही काढले असून याचे उल्लघंन करणाऱ्या चार वधू पालकांना आमगावच्या खंडविकास अधिकारी व ठाणेदार यांनी दंड केला आहे.

५ एप्रिल रोजी सायंकाळी आमगाव तालुक्याच्या बोथली येथील एका लग्नसमारंभावर १० हजारांचा दंड ठोठावला. खुर्शीपार येथेही १० हजाराचा दंड ठोठावला. बासीपार येथील वधुपित्यालाही दहा हजाराचा दंड व ठाणा येथील एका वधुपित्यावर २३ मार्च रोजी १० हजार रुपये दंड करण्यात आला. त्या दंडाची रक्कम त्याच ग्रामपंचायतींना देण्यात आली. ही कारवाई आमगावचे खंडविकास अधिकारी चंद्रकांत साबळे, ठाणेदार सुभाष चव्हाण, विस्तार अधिकारी एल.एम. कुटे, आरोग्य विस्तार अधिकारी झाडे यांनी केली. कारवाईमुळे भीती निर्माण झाली आहे.

५० पेक्षा अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीने कारवाई

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी लग्नसमारंभ व कौटुंबिक कार्यक्रमांसाठी उपस्थितीची मर्यादा घालून दिली आहे. या नियमावलीकडे दुर्लक्ष करून परवानगीशिवाय साखरपुडा व लग्नसोहळ्याचे कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू होते. ही बाब समजल्यानंतर खंडविकास अधिकारी, ठाणेदार यांच्या भरारी पथकाने थेट लग्नमंडप गाठून वधुपित्यांना प्रत्येकी दहा हजार दंड ठोठावला.

शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांच्या अधीन राहून आपले कार्यक्रम शांततेत केल्यास आनंद अजून व्दिगुणीत होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. दंड करून आम्हाला आनंद हाेत नाही. सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.

- चंद्रकांत साबळे, खंडविकास अधिकारी, आमगाव

सरपंच व ग्रामसेवक कारवाई करीत नाही

चारही कार्यक्रम वेगवेगळ्या वस्त्यांवर सुरू होते. एका ठिकाणी मंगलाष्टके होऊन वधू-वर विवाह बंधनात अडकले होते. दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता. तिसऱ्या ठिकाणी स्वागत समारोह होता, तर चौथ्या ठिकाणी लग्न होते. कोरोना प्रतिबंधक समितीचा गावचा प्रमुख सरपंच व सचिव ग्रामसेवक असल्याने त्यांनीच कारवाई करायला हवी. परंतु सरपंच आपले मत खराब होऊ नये म्हणून कारवाईला टाळतात. तर ग्रामसेवकाला गावात काम करायचे असल्याने ते कारवाई करीत नाहीत. परिणामी खंडविकास अधिकाऱ्यांना कारवाई करावी लागते.