शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रम व नियोजनातून मिळाला उत्पन्नाचा मार्ग

By admin | Updated: July 1, 2014 01:19 IST

मनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समोर जाता येते. वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने परिश्रम व नियोजनाचा मार्ग स्वीकारून

भंडारा : मनात जिद्द व परिश्रम करण्याची तयारी असली तर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून समोर जाता येते. वडीलोपार्जीत अडीच एकर शेती असणाऱ्या एका शेतकऱ्याने परिश्रम व नियोजनाचा मार्ग स्वीकारून केळीची व अन्य फळझाडांची बाग फुलवून आर्थिक संपन्नता व उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. लाखनी तालुक्यातील सोमवालवाडा येथील शेतकरी सुरेश तुकाराम टिचकुले यांच्याकडे वडीलोपार्जीत १० एकर शेती होती. आजोबाला चार मुले असल्यामुळे वडीलांच्या हिश्याला अडीच एकर शेती, त्यातही अर्धी पडीत. शिक्षण जेमतेम १० वी पर्यंत झाले. आईवडीलांसह पडीत जमिनीत माती खोदून बांध्या तयार केल्या. कसेतरी खाण्यापुरते धान पिकायला लागले. परिस्थिती नाजूक त्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. अडीच एकर जमीन चार ठिकाणी अर्धा अर्धा एकराचे तुकडे, परंतु एकाच मार्गावर चारही तुकड्यांना नाला लागून आहे. एका तुकड्यावर आजोबांनी विहिर तयार केली होती व मोरीने पाणी काढून भाजीपाला पिकवायचे. गावात श्रीमंत शेतकऱ्यांनी विहिरी खोदून विहिरींवर विद्युत पंप बसवून भाजीपाला लावणे सुरु केले. सुरेश टिचकुले यांना ते शक्य नव्हते. आईवडीलांसोबत नाल्यामध्ये पाच फुट खड्डा तयार केला. जुने विद्युत पंप कसेतरी खरेदी केले. वीज कनेक्शन घेऊन दहा गुंठ्यात भाजीपाला लावणे सुरु केले. त्यामुळे थोडीफार आर्थिक मदत व्हायला लागली. नंतर शासनाच्या जवाहर योजनेतून विहिर मिळाली. उत्पन्न हळूहळू वाढू लागले. शेताशेजारी पडीत जागा खरीदी करून पाच एकराचा प्लॉट तयार झाला. त्यात धान, गहू, उन्हाळी मुंग असे तीन पिके तसेच काही जागेत भटई, वांगे, मिरची, टमाटर, चवळी, गवार, भेंडी, मेथी, कोथींबिर अशी सर्वच प्रकारची वाण घेण्यास सुरुवात केली. शेतीला सेंद्रीय खत मिळावे म्हणून चार पाच म्हशी खरेदी केल्या. दुधातून उत्पन्न मिळायला लागले. तेथे गांडूळ खत निर्मिती केली. शासनाच्या फळबाग विकास कार्यक्रमातून पन्नास कलमी आंबे लावले. साग, कडुलिंब, बांबू यांचीही लागवड केली. शासकीय अनुदानातून तुषार संच बसविला. ओलीताचे क्षेत्र वाढल्याने त्याने नवनवीन प्रयोग सुरु केले. ऊस लागवड केली. त्यामध्ये एकरी ३० टन उत्पन्न मिळाले. ड्रीप संच बसवून केळीची लागवड केली. शेतीच्या राखणीसाठी हिस्सेदार ठेवला असला तरी शेतीची मशागत, डवरणी, खत टाकणे, औषधी फवारणी ते स्वत: करतात. शेतात २० बाय २० मिटरची शेततळे तयार केली. त्यातून मत्स्य उत्पादनही ते घेतात.