शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा होणार

By admin | Updated: June 26, 2014 23:04 IST

खरीप हंगाम तोंडावर असताना महत्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा करणारे अनेक उपकरण नादुरुस्त होते. या प्रकल्पाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने वृत्त

विद्युत पुरवठा सुरु : १५ नव्या बॅटऱ्या दाखल, दखल लोकमतची
रंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा)
खरीप हंगाम तोंडावर असताना महत्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा करणारे अनेक उपकरण नादुरुस्त होते. या प्रकल्पाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने वृत्त मालीकेमधून जनतेच्या दरबारात मांडले. या नंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रकल्पात असणाऱ्या समस्या निकाली काढण्यात आलेल्या असून यंदा पाण्याचा उपसा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सिहोरा परिसरात १४ हजार ९३८ हेक्टर आर शेतीला सिंचीत करण्यासाठी बावनथडी नदीवर महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी शासनाने ६० कोटी ३१ लक्ष रुपये खर्च केले आहे. यामुळे या प्रकल्पाकडे शेतकरी आशान्वीत आहेत. परंतु गेल्या ३-४ वर्षापासून या प्रकल्पस्थळात ठीक ठाक नाही. अशा चर्चा आहेत.
सध्या प्रकल्प स्थळात अस्तव्यस्त आहे. प्रकल्पस्थळातील समस्या निकाली काढताना निधीची अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी नदी पात्रात टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे.
या टाकीचा गेल्या चार वर्षापासून उपसा करण्यात आलेला नाही. टाकीत नदी पात्रातील गाळ आणि रेतीचा थर आहे. टाकीतील पंपगृहाने पाण्याचा उपसा करताना पंपगृह जाम झाली आहे. ९ पैकी ४ पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे यंत्रणा किती जागृत आहे याची प्रचिती अनुभवास येत आहे. दरम्यान पंपगृहाला वीज पुरवठा करण्यासाठी ५५ बॅटऱ्या नियोजित आहे. या बॅटऱ्या विद्युत पुरवठ्याने चार्जींेग करण्यात येत आहेत. यापैकी अनेक बॅटऱ्या नादुरुस्त आहेत. यामुळे प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही असा साशंक प्रश्न शेतकऱ्यात निर्माण झालेला आहे. कवलेवाडा येथून विद्युत प्रवाह सुरु असताना प्रकल्पस्थळात अंधार असताना यंत्रणा दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पावसाळा आणि खरीप हंगाम तोंडावर असतानाही यंत्रणा जागृत असल्याचे दिसून येत आहे.
या संदर्भात लोकमतने वृत मालीका प्रकाशित करीत शासनाचे लक्ष वेधले आहे. या वृत्ताची दखल घेत यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पंपगृहांना विद्युत पुरवठा करणाऱ्या नादुरुस्त बॅटऱ्या हटविण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पस्थळात नव्या १५ बॅटऱ्या प्राप्त झालेल्या आहेत. यामुळे प्रकल्पस्थळात खंडीत असलेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे. या प्रकल्पस्थळात ऐरवेशनची प्रमुख समस्या आहे. पाण्याचा उपसा करीत असताना येरवेरात टंकर बंद ठेवणे धोक्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान प्रकल्पस्थळात प्रवेश नाकारण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा प्रकल्पस्थळात असलेली समस्या तातडीने निकाली काढण्यात आल्याने नदी पात्रातील पाण्याचा उपसा विस्तीर्ण चांदपूर जलाशयात होणार आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र दगाबाज ठरत आहे. या नदीचे पात्र सध्यातरी कोरडे आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प पाण्याचा उपसा करण्यासाठी सज्ज असताना नदी पात्रात पाणी नाही. या प्रकल्पाला राजीव सागर (बावनथडी प्रकल्प)चे पाणी सोडण्याची ओरड आता शेतकरी करीत आहेत.
शेतकऱ्यांनी खरीप हंगाम लक्षात घेता धानाची पेरणी केली आहे. परंतु शेत शिवारात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या कोमेजल्या असल्याने चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यासाठी नियोजन करण्याची बोंबाबोंब गावात ऐकायला येत आहे.