शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाचे पाणी शिरले शेतात

By admin | Updated: January 11, 2015 22:45 IST

गोसे प्रकल्पातील पाणी खापरी यथील शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे मिरचीचे बाग, कापूस, धानाचे पऱ्हे, चना, मुग आदी पिक पाण्याखाली आली आहेत. प्रशासाने याकडे लक्ष

पालोरा (चौ.) : गोसे प्रकल्पातील पाणी खापरी यथील शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे मिरचीचे बाग, कापूस, धानाचे पऱ्हे, चना, मुग आदी पिक पाण्याखाली आली आहेत. प्रशासाने याकडे लक्ष देवून गावाचे पुनर्वसन करावो व मोबदला देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.खापरी गाव जंगलाने व्यापलेला असल्यामुळे वन्य प्राण्याचा गावात व शेतात हैदोस सुरु आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मागील महिन्यात शेतकऱ्यांनी शेतात विविध बागायती शेती व कठाण पीक शेतात पेरले होते. मिरचीचे पीक हातात आले होते. लक्षावधी रुपये खर्च करून शेतात पिक घेतले होते. एकीकडे वन्य प्राणी शेतमालाची नुकसान करीत आहेत तर दुसरीकडे गोसे प्रकल्पात पाणी अडविल्यामुळे संपूर्ण परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. पाणी अडविणार कुणीही पीक घेऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्व सूचना देण्यात आली नसल्यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथे रोजगाराची दुसरे साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मिरचीचे पीक पाण्याखाली आल्यामुळे मिरचीचा तोडा कसा करावा, कर्ज कसे फेडावे अशा विविध प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गोसे प्रकल्प अंतर्गत जी शेती गेली आहे त्या शेतीचा प्रशासनाकडून अजून मोबदला सुद्धा मिळाला नाही. जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते. गावात रोजगार उरला नसल्यामुळे वन विभागाकडून जंगलात जाण्यास बंदी असताना सुद्धावितभर पोटाची खडगी भरण्याकरिता जंगलात जावून मोऱ्या आणून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. (वार्ताहर)