प्रकल्पाचे पाणी शिरले शेतात

By Admin | Updated: January 11, 2015 22:45 IST2015-01-11T22:45:52+5:302015-01-11T22:45:52+5:30

गोसे प्रकल्पातील पाणी खापरी यथील शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे मिरचीचे बाग, कापूस, धानाचे पऱ्हे, चना, मुग आदी पिक पाण्याखाली आली आहेत. प्रशासाने याकडे लक्ष

The water started in the field | प्रकल्पाचे पाणी शिरले शेतात

प्रकल्पाचे पाणी शिरले शेतात

पालोरा (चौ.) : गोसे प्रकल्पातील पाणी खापरी यथील शेतामध्ये शिरले आहे. त्यामुळे मिरचीचे बाग, कापूस, धानाचे पऱ्हे, चना, मुग आदी पिक पाण्याखाली आली आहेत. प्रशासाने याकडे लक्ष देवून गावाचे पुनर्वसन करावो व मोबदला देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खापरी गाव जंगलाने व्यापलेला असल्यामुळे वन्य प्राण्याचा गावात व शेतात हैदोस सुरु आहे. येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मागील महिन्यात शेतकऱ्यांनी शेतात विविध बागायती शेती व कठाण पीक शेतात पेरले होते. मिरचीचे पीक हातात आले होते. लक्षावधी रुपये खर्च करून शेतात पिक घेतले होते. एकीकडे वन्य प्राणी शेतमालाची नुकसान करीत आहेत तर दुसरीकडे गोसे प्रकल्पात पाणी अडविल्यामुळे संपूर्ण परिसरातील शेती पाण्याखाली आली आहे. पाणी अडविणार कुणीही पीक घेऊ नये म्हणून प्रशासनाकडून पूर्व सूचना देण्यात आली नसल्यामुळे पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. येथे रोजगाराची दुसरे साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. मिरचीचे पीक पाण्याखाली आल्यामुळे मिरचीचा तोडा कसा करावा, कर्ज कसे फेडावे अशा विविध प्रश्नाने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गोसे प्रकल्प अंतर्गत जी शेती गेली आहे त्या शेतीचा प्रशासनाकडून अजून मोबदला सुद्धा मिळाला नाही. जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते.
गावात रोजगार उरला नसल्यामुळे वन विभागाकडून जंगलात जाण्यास बंदी असताना सुद्धावितभर पोटाची खडगी भरण्याकरिता जंगलात जावून मोऱ्या आणून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The water started in the field