शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

खोलमारा नदीघाटावर वाळूमाफियांची दबंगगिरी

By admin | Updated: November 11, 2014 22:34 IST

लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील नदी घाटावर वाळू माफीयांची दबंगगिरी सुरु असून रोजच रात्री व दिवसा रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र या वाळूमाफीयांकडून ग्रामस्थांना विविध

बारव्हा : लाखांदूर तालुक्यातील खोलमारा (जुना) येथील नदी घाटावर वाळू माफीयांची दबंगगिरी सुरु असून रोजच रात्री व दिवसा रेतीची चोरटी वाहतूक सुरु आहे. मात्र या वाळूमाफीयांकडून ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रोजच या नदीघाटावरून ५० ते ६० ट्रीप रात्री बेरात्री चोरटी वाहतूक होत असताना सुद्धा अजूनपर्यंत महसूल विभाग कर्मचारी अथवा पोलीस विभागाने एकाही ट्रॅक्टर चालकावर कारवाई केली नसल्याने ग्रामस्थात संबंधित विभागाविषयी रोष व्यक्त करण्यात येत आहे.शासनाने अजूनपर्यंत कोणत्याही रेती घाटाचा लिलाव केला नाही. सध्या बारव्हा परिसरात विविध विकास कामांना गती आली आहे. संबंधित बांधकामातील मुख्य घटक म्हणून रेतीकडे बघितले जाते. सध्या खोलमारा (जुना) या रेतीघाटावरील वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने परिसरातील तई, बेलाटी, बारव्हा, तावशी, मासळ, हरदोली आदी गावातील वाळू माफीये येथून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करीत आहेत. रोजचे ५० ते ६० ट्रीप रेती चोरट्या मार्गाने जात असून कोणताही महसूल विभागाचा कर्मचारी ढुंकूनही पाहत नाही आणि एखाद्या दिवशी आलेच तर सदर ट्रॅक्टरवर कारवाई न करता सेटींग करण्यात येत असल्याची ओरड आहे. आज दि. ११ नोव्हेंबर रोजी दिघोरी पोलीस यांनी खोलमारा नदीघाटावर पहाटेच्या सुमारास धाड घातली. त्यावेळी एक ट्रॅक्टर रेती भरलेला मिळाल्याची ग्रामस्थात चर्चा आहे. मात्र त्याच्याकडून संबंधित ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करता नदीतूनच रेती भरलेला ट्रॅक्टर सोडून सेटींग करण्यात आली असावी अशी ग्रामस्थात दबक्या आवाजात चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्यात रेती माफियांवर लगाम लावण्यासाठी प्रशासनातर्फे विविध ठिकाणी धाड घालण्यात येत आहे. ग्रामीण क्षेत्रात मात्र रेती तस्करांवर मेहरनजर का? असा सवालविचारत आहेत. (वार्ताहर)