शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई आराखडा मंजुरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: February 25, 2015 01:09 IST

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत.

चंदन मोटघरे लाखनीफेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी अनेक गावात मिळत नाही तसेच विहीरी कोरड्या पडत आहेत. तालुक्यात पाणी टंचाई बहृद आराखडा तयार करण्यात आला आहे. खंडविकास अधिकारी व तहसिलदार यांनी जानेवारी ते मार्च २०१५ पर्यंत टंचाई निवारनार्थ ३ गावांची निवड केली आहे तर एप्रिल ते जुन २०१५ पर्यंतसाठी टंचाई निवारनार्थ ९ गावांची निवड प्रशासनाने केली आहे. तालुक्यात १०२ गावे आहेत यापैकी निम्म्यापेक्षा जास्त गावात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. जानेवारी ते मार्चपर्यंत पेंढरी येथे नळयोजना कार्यान्वित करण्यासाठी १ लक्ष रुपयाचे कामांची मागणी करण्यात आली आहे. पोहरा येथे नळ योजना पाईप लाईन दुरुस्तीसाठी २ लक्ष रुपयाचा खर्च अपेक्षित आहेत. मुरमाडी (तुपकर) येथे नळ योजना पुरवठा व विहीरीतील गाळ उपसणे यासाठी एक लक्ष रुपयांची गरज आहे. तिन्ही गावात सद्या हातपंप, सार्वजनिक विहीरी व नळयोजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु उन्हाळ्यात वरील गावात पाण्याची तिव्र टंचाई भासते पाणी टंचाई बृहद आराखड्यानुसार एप्रिल ते जुन महिण्यात ९ गावात पाणीटंचाईसाठी पुरक कामे करावयाची आहेत. यात खराशी येथिल धानला टोली येथे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी १ विंधन विहीर तयार करणे व विहीरीतल खोलीकरण करून गाळ काढणे यासाठी १ लक्ष १० हजार रुपयाचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मानेगाव येथे ९० हजार रुपयाचे १ विंधन विहीर प्रस्तावित केली आहे. पाथरी येथे दोन विहीरीचे खोलीकरण व गाळ काढण्यासाठी ४० हजार रुपयाची मागणी केली आहे. नरव्हा येथे ९० हजार रुपयाचे १ हातपंप, गोंडसावरी येथे २ विहीरीचे खोलीकरण, पिंपळगाव (सडक) येथे टोलीवर विहीर खोल करणे व गाळ काढण्यासाठी ४० हजाराची मागणी केली आहे. तालुक्यातील किन्ही येथे टोलीवरील विहीर खोल करणे, चान्ना येथे नळयोजनेची पुरवठा विहीर खोल करणे गाळ काढण्यासाठी एक लक्ष रुपयाची कामे प्रस्तावित आहेत. परसोडी (पवार) येथे विंधन विहीर व दोन विहीर खोल करण्यासाठी ४० हजार रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.तालुक्यातिल १२ गावात पाणी टंचाई निवारनार्थ कामासाठी ९ लक्ष ७० हजार रुपयाची गरज आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागा जिल्हा परिषद भंडारा यांनी टंचाई निवारनार्थ कामांना अद्यापही मंजुरी मिळाली नाही. पाणीप्रश्न बिकट बनल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का हा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे.