शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा, चुलबंद, बावनथडी नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा घाटाची पाहणी केली, तेव्हा ठिकठिकाणी रेती उपसाचे खड्डे आणि तिरावर रेतीचे ढिग दिसून आले. दिवसा ढवळ्या रेती जेसीबीने भरून नेली जात असल्याचे चित्र दिसत होते.

ठळक मुद्देलिलाव नसताना उपसा : रेती वाहतुकीसाठी नदीची नैसर्गिक संरक्षक भींत थडी पोखरली

भंडारा : रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या घाटांवर लिलाव नसतानाही बेसुमार उपसा सुरू आहे. मशिनच्या अहोरात्र उत्खनन केले जात असल्याने जिल्ह्यातील वैनगंगा, चुलबंद, सूर, बावनथडी नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदीपात्रात मोठाले खड्डे तयार झाले असून वाहतूक सुलभ व्हावी यासाठी नदीची नैसर्गिक भींत थडी खचविण्याचे प्रकार सुरू आहे. यामुळे पर्यावरणासोबतच नदी तिरावरील गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.भंडारा जिल्ह्यात पूर्वी ९० पेक्षा अधिक रेतीघाट होते. परंतु गोसे प्रकल्पामुळे घाटांची संख्या कमी झाली. जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव १४ महिन्यांपासून झाला नाही. दुसरीकडे वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. शासनाच्या महसुलाला चूना लागत आहे. मोहाडी तालुक्यातील रोहा घाटाची पाहणी केली, तेव्हा ठिकठिकाणी रेती उपसाचे खड्डे आणि तिरावर रेतीचे ढिग दिसून आले. दिवसा ढवळ्या रेती जेसीबीने भरून नेली जात असल्याचे चित्र दिसत होते.

पात्र रूंदावल्याचा फटकारेतीचा उपसा होत असल्याने चुलबंद, सूर, बावनथडी नदीचे अनेक ठिकाणी पात्र विस्तारले आहे. चांदमारा, आष्टी, धुटेरा यासह गुडेगाव, धानोरी, एनोटा येथे नदीपात्र गावाकडे सरकत असल्याचे दिसत आहे. चुलबंद नदीचीही अशीच अवस्था आहे. वाहतूक सुलभ व्हावी म्हणून तस्कर रस्ता तयार करण्याच्या नादात नदीची थडी फोडून काढतात. त्यामुळे पुराचा धोका वाढत आहे.

दररोज होणारा वाळू उपसाबावनथडी नदीच्या चांदमारा, आष्टी, धुटेरा, सक्करदरा, वैनगंगा नदीच्या रोहा, बेटाळा, माडगी, ढोरवाडा, निलज, बाम्हणी, उमरवाडा, रेंगेपार यासह गुडेगाव, धानोरी, एनोडा, सिंदपूरी, मांगली आणि चुलबंद नदीच्या गवराळा, नांदेड, धर्मापुरी, इटान, अंतर्गाव घाटांवर मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. पर्यावरणवाद्यांनी अनेकदा आवाज उठविला. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.

निसर्गाची अनमोल देणगी लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत आहे. तस्करीमुळे नदी पात्राला पर्यायाने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ रेतीघाटांचे लिलाव करण्याची गरज आहे. तेव्हाच यावर पायबंद बसेल.- मो.सईद शेख, पर्यावरण तज्ज्ञअध्यक्ष, ग्रीनहेरिटेज,भंडारा.

टॅग्स :riverनदी