शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांपासून शिक्षकाची वेतनासाठी भटकंती

By admin | Updated: August 17, 2016 00:19 IST

देशाची भावी पिढी घडविणारे व शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकावरच कर्तव्य बजावित असतानाही

भंडारा : देशाची भावी पिढी घडविणारे व शिक्षणासारखे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकावरच कर्तव्य बजावित असतानाही आता उपासमारीचे संकट ओढाविले आहे. तीन महिन्यापूर्वी प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या या शिक्षकाचे वेतन थांबल्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले असून शिक्षकाला हक्काच्या वेतनासाठी भटकंती करावी लागत आहे. लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनमाळा येथे सहाय्यक शिक्षक असलेल्या धनराज वाघाये या शिक्षकावर हा प्रसंग ओढावला आहे. वाघाये हे सोमनाळा येथे शिक्षक होते. दरम्यान शिक्षकांच्या बदलीसंदर्भात झालेल्या कार्यशाळेनंतर त्यांची बदली करण्यात आली. लाखनी पंचायत समितीतून त्यांना भंडारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पचखेडीला पदस्थापनेवर बदली करण्यात आली. जूनमध्ये त्यांना मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी पचखेडीला रूजू होण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार ते कर्तव्यावर रूजू झाले. दरम्यान ठाणा जि.प. शाळेत शिक्षकांचे पद रिक्त असल्याने वाघाये यांना ठाणा येथे तात्पुरते रूजू होण्याचे आदेश भंडारा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी एस.एच. तिडके यांनी दिले. पदस्थापनेवर रूजू झाल्यानंतर तात्पुरत्या आदेशानंतर ठाण्याला रूजू होणारे वाघाये कर्तव्य बजावत असताना दरम्यान न्यायालयाने शिक्षकांच्या बदलीप्रक्रियेला स्थगनादेश दिले. त्यामुळे वाघाये हे ठाणा येथे कर्तव्य बजावत आहेत. मागील तीन महिन्यांपासून वाघाये हे शिक्षण विभागाच्या आदेशानुसार ठाणा येथे कर्तव्य बजावत असतानाही शिक्षण विभागाने त्यांना वेतनापासून वंचित ठेवलेले आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. वेतन मिळावे यासाठी त्यांनी अनेकदा पंचायत समिती शिक्षण विभाग व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उंबरठे झिजविले आहे. मात्र शिक्षण विभागाने त्यांची अद्यापही दखल घेतलेली नाही. वाघाये यांनी त्यांना वेतन मिळावे अशी मागणी केली असतानाही शिक्षण विभागाने त्यांना उडवाउडवीचे उत्तर दिली आहेत. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)गटशिक्षणाधिकारी तिडके अनभिज्ञ !वाघाये यांना ठाणा येथे प्रतिनियुक्तीवर रूजू होण्याबाबत भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तिडके यांनी आदेश बजावले. त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी प्रस्तूत प्रतिनिधीने आज बुधवारला दुपारी ३.०१ वाजता त्यांना विचारणा केली असता सदर शिक्षकाची माहिती नाही. त्यामुळे त्यांची सविस्तर माहिती काढून सांगतो असे उत्तर दिले. सायंकाळी ५.१४, ५.१५, ५.२०, ६.२८ वाजता त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यावरूनच शिक्षण विभाग व त्यांचे अधिकारी शिक्षकांप्रती किती आस्था दाखवितात हे दिसून आले. पतसंस्था अध्यक्ष गायधने सरसावलेशिक्षक वाघाये यांचे मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यासाठी ते शिक्षण विभागात सतत संपर्कात आहेत. मात्र प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षकांच्या पतसंस्थेत कर्जासाठी अर्ज सादर केला. त्यांचे नियमित वेतन येत नसल्याने शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने यांनी त्यांच्या वेतनासाठी पुढाकार घेतला. त्यांनी आज बुधवारला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, शिक्षण विभाग व वित्त विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वाघाये यांचे रखडलेले वेतन त्वरीत द्यावे व त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केला. पचखेडी येथे जिभकाटे नावाच्या दोन शिक्षिका आहेत. नाम साधर्म्यामुळे अडचण निर्माण झाली. दरम्यान न्यायालयाने बदली प्रकरणात स्थगिती दिली. यामुळे वाघाये यांचे प्रकरण शिक्षण आयुक्तांकडे गेले आहे. त्यावर लगेच तोडगा निघाल्यास त्यांचे वेतन देण्यात येईल.- सुवर्णलता घोडेस्वार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)प्रगत शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करीत आहेत. शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याची तरतूद शिक्षण विभागाने तातडीने करावी. शिक्षकांच्या वेतनाचा अन्याय खपवून घेणार नाही.- मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष, म.रा. प्रा. शिक्षक संघ.