वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकरी उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:56+5:30

गोंदेखारी येथे यापूर्वी एका इसमावर हल्ला केला होता. या घटनांमुळे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळ झाली की नागरिक घराबाहेर पडत नाही. शेतशिवारातील कामे प्रभावित झाली आहे. मजूर आणि शेतकरी शेतात जायला तयार नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिकांची नर्सरी प्रभावित झाली आहे.

Villagers descended on the road to settle tigers | वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकरी उतरले रस्त्यावर

वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकरी उतरले रस्त्यावर

Next
ठळक मुद्देसिहोरा येथे ठिय्या आंदोलन : भीतीपोटी शेतकऱ्यांनी केले शेतात जाणे बंद, वनपथकाकडून शोध जारी

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : भर दिवसा हल्ला करणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी सोमवारी तुमसर तालुक्यातील सिहोरा बसस्थानकासमोर गावकऱ्यांनी तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. गत दोन आठवड्यांपासून तुमसर तालुक्यात वाघाने दहशत निर्माण केली असून आतापर्यंत चौघांना जखमी केले आहे. या वाघाच्या भीतीने शेतकºयांनी शेतशिवारात जाणे बंद केले आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या बिनाखी, गोंदेखारी परिसरात गत काही दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. रात्री बेरात्री वाघाच्या डरकाड्या ऐकायला येत आहेत. अशातच २५ जानेवारी रोजी बिनाखी शिवारात या वाघाने भर दिवसा मोटरसायकल स्वारांवर हल्ला केला. तसेच वाघाला पाहण्यासाठी गेलेल्या एका तरूणावर वाघाने झडप घातली. तर गोंदेखारी येथे यापूर्वी एका इसमावर हल्ला केला होता. या घटनांमुळे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळ झाली की नागरिक घराबाहेर पडत नाही. शेतशिवारातील कामे प्रभावित झाली आहे. मजूर आणि शेतकरी शेतात जायला तयार नाही. त्यामुळे उन्हाळी धानपिकांची नर्सरी प्रभावित झाली आहे.
अशातच रविवारी सायंकाळी ७ वाजता बिनाखी गावाच्या शिवारात असलेल्या राईस मिलमध्ये हा वाघ शिरला. मील मालक अनिल रहांगडाले यांनी वनविभागाला याची माहिती दिली. परंतु कुणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. या वाघाचा बंदोबस्त करावा, यासाठी चुल्हाड बसस्थानकासमोर सोमवारी सकाळी ११ वाजता गावकºयांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, उमेश तुरकर, माजी सभापती कलाम शेख, रामेश्वर मोटघरे, क्रिष्णा बनकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. वनविभागाच्या निक्रियतेविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला. नुकसानग्रस्त शेतकरी संजय रहांगडाले यांना शासकीय मदत देण्याऐवजी वनविभागाच्या कर्मचाºयांनी त्याला हाकलून लावल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
या आंदोलनाला सहायक वनसंरक्षक मलहोत्रा, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वनपरिक्षेत्राधिकारी लुचे यांनी भेट दिली. आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पाच पथक तयार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावरून तीन तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले गणेश बनकर, शंकरलाल तुरकर, छोटेलाल ठाकरे, विजय शहारे यांना अद्यापही वनविभागाने मदत दिली नाही. त्यामुळे आंदोलनात संताप दिसून येत होता. या आंदोलनात फिकीर बिसने, संतोष बघेले, अनिल बिसने, कांचन कटरे, देवेंद्र मेश्राम, शिवा नागपुरे, विनोद पटले, गुड्डू श्यामकुंवर, संतोष पटले, राजेंद्र बघेले आदी सहभागी झाले होते. महसूल मंडळ अधिकारी मोहतूरे, तलाठी जिबलेकर, बावनकुळे यांनी भेट दिली. तुमसरचे ठाणेदार श्रीराम, गोबरवाहीचे मैसकर व सिहोराचा देवेंद्र तुरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
समृद्ध जंगलात स्थलांतरीत वाघ
बपेरा परिसरात धुमाकूळ घालणारा वाघ मध्यप्रदेशातून स्थलांतरीत झाल्याचा अंदाज आहे. तुमसर, नाकाडोंगरी, लेंडेझरी जंगल समृद्ध मानले जाते. त्यामुळे या भागात हा वाघ मुक्तपणे संचार करीत आहे.

हल्लेखोर वाघ सोंड्या जंगलात
तुमसर : बिनाखी येथे तिघांवर हल्ला करणारा वाघ सोंड्या जंगलात शिरल्याची माहिती आहे. वनविभागाच्या पथकाला वाघाचे पगमार्क आढळून आले आहे. आता त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक जंगल पिंजून काढत आहे. मात्र अद्यापर्यंत वाघाला पकडण्यात यश आले नाही. बिनाखी, महालगाव, चांदपूर जंगलात वनविभागाचे पथक डेरेदाखल आहेत. धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला पकडण्यासाठी त्याला प्रथम बेशुद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशिष्ट प्रणालीने त्याला शुट करून बेशुद्ध केले जाणार आहे. गोंदिया येथील एक पथक जंगलात रवाना करण्यात आले आहे.

विधासभा अध्यक्षांना निवेदन
बिनाखी येथे वाघाच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. त्यांना तात्काळ आर्थिक मदत देवून उपचाराचा खर्च शासनाने उचलावा या आशयाचे निवेदन विधानसीा अध्यक्ष नाना पटोले यांना मुंबई येथे तुमसर पंचायत समितीचे सदस्य हिरालाल नागपुरे यांनी दिले.

उन्हाळी धानाची नर्सरी करपण्याच्या मार्गावर
बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकºयानी शेतात जाने बंद केले. परिणामी उन्हाळी धानाची नर्सरी करपण्याच्या मार्गावर आहे. रात्री देण्यात येणारा थ्री फेज वीज पुरवठा दिवसा करण्याची मागणी करण्यात आली आहे. या परिसरात लाखोळी, हरभरा, गहू, जवस आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. परंतु वाघाच्या भीतीमुळेच कोणीच शेतात जायला तयार नाही. परिणामी शेतातील पीक करपण्याची भीती आहे. बिनाखी गावातील गौतम नानक हा शेतकरी रविवारी रात्री मोटारपंप सुरू करण्यासाठी शेतात गेला होता. त्याला वाघाची डरकाडी ऐकू येताच त्याने गावाचा रस्ता धरला. रात्री ऐवजी दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी बिनाखी येथील किशोर रहांगडाले यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Villagers descended on the road to settle tigers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.