शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलमय रस्त्यांमुळे तुटला गावाचा संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:01 IST

शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव परिसरातील नागरिकांना रहदारीदरम्यान सहन करावा लागत असतो.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये अपघाताची भीती : जीव मुठीत घेऊन रहदारी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतात रोवणीसाठी ट्रॅक्टरने चिखलणी करतानाच चिखलाने माखलेले ट्रॅक्टर चिखल मातीसह रस्त्यावर काढले जात असल्याने चौरसातील सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. सदरच्या चिखलमय रस्त्यावरून पावसात ये जा करणाऱ्या वाहनधारक नागरिकांत अपघाताची भीती निर्माण झाली आहे. चौरास भागातील चिखलमय रस्त्यांनी अनेक गावाचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.लाखांदूर तालुक्यातील विशेषत: चौरास भागात धानपीक रोवणीला वेग आला आहे. धान रोवणीसाठी चिखलणी साठी या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करतात.शासन कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून या भागात डांबरीकरणाच्या रस्त्यांचे बांधकाम केले असले तरी पावसाळ्याच्या दिवसात ट्रॅक्टरने शेतातून येणाºया चिखलमाती मुळे संबंधित रस्ते अवघ्या वर्षभरातच खड्डेमय होत असल्याची वास्तविकता आहे. याचा सर्वाधिक फटका गाव परिसरातील नागरिकांना रहदारीदरम्यान सहन करावा लागत असतो.या सबंध गैरप्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनासह बांधकाम विभाग व वाहतूक नियंत्रण विभागाला असली तरी संबंधितांकडून हेतूपुरस्पर डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही नागरिकांफर्ते केला जात आहे.चिखलमय रस्ते होताना वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन गावांचा संपर्क तुटल्याने चौरसातील जनतेत नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतातून ट्रॅक्टरने चिखल माती सह रस्त्यावर येणाºया वाहन चालका विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.चिखलणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ट्रॅक्टर चिखल मातीने भरलेल्या अवस्थेतच रस्त्यावर काढले जात असल्याने ट्रॅक्टरच्या चाकांना असलेले चिखल माती रस्त्यावर पडून पावसात अपघाताची भीती निर्माण झाली आहे. साधारण पावसात या भागातील रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहनाने ये-जा करणे धोकादायक ठरत असल्याने चिखलमय रस्त्यांमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक