शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा संकटात

By admin | Updated: July 19, 2014 23:46 IST

पवनी तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युहात सापडला असून पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा,

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यात मागील एक महिन्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने बळीराजा निसर्गाच्या चक्रव्युहात सापडला असून पुन्हा कर्जाच्या डोंगरात सापडलेला आहे. पालोरा, लोणारा, बाम्हणी, मोखारा, खैरी (दिवाण) भागात ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे अशा शेतकऱ्यांचे रोवणी संपत आली आहे. मात्र कोरडवाहू शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. दोन दिवसापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. याचा फायदा रोवणी केलेल्या शेतकऱ्यांना झाला. पुन्हा पावसाने दडी मारली. पहिल्यांदा दुसऱ्यांदा पेरणी वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. भारनियमनामुळे रोवणी झालेल्या शेतामध्ये भेगा पडत आहेत. या भागात अनेक कोरडवाहू शेतकरी आहेत. हे शेतकरी निसर्गाच्या दहशतीखाली जीवन जगत असल्याचे बोलके चित्र पहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसापासून पाऊस दमछाक करीत आहे. आजही ज्या नागरिकांनी निसर्गाचा हा अस्मानी रौद्ररुप बघितला त्यांनी आजपर्यंत आम्ही असा प्रकोप बघितला नसल्याचे वयोवृद्ध नागरीक सांगत आहेत. एवढी भयावह स्थिती येवूनही शासनाकडून कोणतीही मदत नाही. निसर्गाचे हे दृष्टचक्र मागील पाच वर्षापासून सतत सुरु आहे. कधी पाणी येते तर पिक नष्ट करून जाते. तर कधी पाण्याविना पिके वाया जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.मात्र यावर्षी पाण्याविना पेरण्या खोळंबल्या आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी अकाली पाऊस तर कधी महापूर. याचा सामना बळीराजा करीत आहे. यामुळे शेतकरी कर्जाच्या डोंगरात सापडत आहे. आज ना उद्या निसर्ग साथ देईल या आशेवर शेतकरी शेती करीत आहे. यावर्षी ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी भारनियमनाचा सामना करीत रोवणी करण्यासाठी कामाला सुरुवात केली. रोवणी तर झाली मात्र भारनियमनाचा भुताने पिकाला पाणी देणे कठीण झाले आहे. जमिनीला भेगा पडत आहेत. धानपिक वाचविण्यासाठी बळीराजाची सर्वत्र धावपळ सुरु आहे. निसर्गाचा लहरीपणा आड येत आहे. कोरडवाहू शेतकरी तर हातावर हात धरून बसला आहे. आज ना उद्या पाऊस येईल म्हणून वाट पाहत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे रोवणी झाली त्यांना पिकाला पाणी देणे अशक्य झाले आहे. अशा या निसर्गाच्या दृष्टचक्रातून बळीराजा केव्हा मुक्त होणार? असा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे. (वार्ताहर)