शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा दिसणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकॅशलेस प्रणाली लागू होणार : ऑटोमॅटिक पद्धतीने टोल प्लॉझा उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : महामार्गावरुन प्रवास करताना तासनतास टोलनाक्यावर ताटकळत थांबावे लागत होते. परंतु आता टोल टॅक्स जमा करण्याकरिता रांगेत लागण्याची व तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधीकरण अंतर्गत येणाऱ्या सर्व वाहनाना डिसेंबर २०१९ पासून कॅशलेस करण्याची तयारी सुरू प्रशासनाकडून करण्यात आली आहे.सध्या प्रात्यक्षिक स्वरूपात याची चाचपणी विविध टोल नाक्यांवर घेण्यात येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याकरिता वाहन चालकांना चीप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे.चीपकार्ड लावलेल्या वाहनांना टोल प्लॉझावर पोहचताच तेथे असणाऱ्या स्कॅनर चीपला स्कॅन होवून आॅटोमॅटिक पद्धतीने टोल प्लॉझाचा गेट उघडला जाणार असल्याने यामुळे वाहनधारकांची त्रासातून सुटका होणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे वाहन मालकांच्या बँक खात्यातून रक्कम कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना कॅश देण्याची गरज पडणार नाही. अनेक ठिकाणी टोल प्लॉझावर टॅक्स जमा करावा लागतो. मात्र तासनतास वाहनांच्या रांगा व सुट्या पैशाच्या कारणांवरुन एनएचएआयने निर्णय घेतला आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त नवीन तयार केलेल्या मार्गांवर ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. टोल नाल्यावर चार चाकी वाहन व जड वाहनांना वाहनकोंडीमुळे तेथून निघणे त्रासदायक होत होते. वाहनधारकांची होणारी समस्या लक्षात घेत केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीमध्येया संदर्भात अंमलबजावणीसाठी माहिती दिली आहे. त्यामुळे आता अनेक मार्गावरील टोल प्लॉझावर लागणाºया लांबच लांब रांगेपासून वाहनधारकांची सुटका होणार आहे. चिल्लर पैशामुळे होणारे वादविवाद आता कमी होण्यास मदत मिळणार आहे. सहापदरी व चारपदरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याच्या बांधकामाच्या खर्चानुसार विविध रस्त्यांवर वेगवेगळ्या रक्कमेच्या स्वरुपात टोलरक्कम मोजावी लागणार आहे.जनतेच्या तसेच वाहन चालकांच्या सोयीसाठी केंद्र सरकारने टोलसंदर्भात नवीन व्यवस्था लागू केली आहे. ज्याची सध्या चाचपणी सुरु आहे. त्याकरिता वाहनांमध्ये फॉस्टटॅग चीप लावण्यात येणार असून याकरिता विविध कंपन्यांचे एजेंट टोलनाक्यावर उपस्थित राहून वाहन चालकांना त्याच्यासाठी लागणारा खर्च घेवून फॉस्टटॅग चीप लावून देतील.-धीरज दीक्षित, टोल व्यवस्थापक, साकोली.

टॅग्स :tollplazaटोलनाका