कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:53+5:30

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी, जमावबंदी व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यानुसार गावपातळीपासून ते नागरी व शहरी भागातदेखील ही यंत्रणा अहोरात्र राबतांना दिसत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल ३५ रिक्त कर्मचाºयांविना सात उपकेंद्र व २५ गावांतील नागरिकांची आरोग्य सुविधा पुरवितांना कार्यरत अधिकारी कर्मचाºयांची एकच धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.

Vacancy of 25 staff posts under Kudegaon Primary Health Center | कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

Next
ठळक मुद्देकोरोनावर मात करण्यासाठी जिकरीचे प्रयत्न, सात उपकेंद्र व २५ गावांतील नागरिकांची आरोग्य सुविधा पुरवितांना धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कोरोना विषाणूच्या संकटकालिन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेकडून प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून तोकड्या अधिकारी कर्मचारी संख्येतही जिकरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तब्बल ३५ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याची खळबळजनक माहिती असून आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी, जमावबंदी व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यानुसार गावपातळीपासून ते नागरी व शहरी भागातदेखील ही यंत्रणा अहोरात्र राबतांना दिसत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल ३५ रिक्त कर्मचाऱ्यांविना सात उपकेंद्र व २५ गावांतील नागरिकांची आरोग्य सुविधा पुरवितांना कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाल्याचे दिसून येत आहे.
२५ गावांचा समावेश असलेल्या कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रत्येकी सात उपकेंद्र्र व आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आहेत. त्यामध्ये कुडेगाव, किरमटी, मोहरणा, खैरी / पट, सोनी, मडेघाट व पुयार आदिंचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या नियमानुसार या उपकेंद्रात प्रत्येकी दोन आरोग्य सेविका व दोन आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आरोग्यवर्धिनी केंद्रात प्रत्येकी एका वैद्यकिय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र मागील अनेक दिवसापासून या केंद्राअंतर्गत येणाºया सात उपकेंद्रांमध्ये केवळ १४ पैकी ७ आरोग्य सेविका, परिचारीका व १४ आरोग्य सेवकांपैकी केवळ चारच आरोग्य सेवक व केवळ एक वर्धिनी केंद्र वैद्यकिय अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आहे. आरोग्य सेविका, परिचारीकांना मदतनिस म्हणून सातही उपकेंद्रात प्रत्येकी एक पद रिक्त आहे. तालुक्यातील खैरणा गावात आशा वर्करचे पद रिक्त असल्याची माहिती आहे.
दरम्यान , कुडेगाव येथील उपकेंद्रात एका आरोग्य सेविकेची नियुक्ती असून त्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिण्यापूर्वीच रुजु देखील झाल्या आहेत. मात्र तोकड्या कर्मचाºयांअभावी या आरोग्य सेविकेने उपकेंद्राचे दार देखील उघडले नसल्याची वास्तव चर्चा गावकºयांत आहे.

सुविधांचा अभाव
शासन प्रशासनाकडून गावागावांत आरोग्य सोयीसुविधा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या दवाखान्यामध्ये अधिकारी, कर्मचाºयांची पदे रिक्त असून सुविधांचा वाणवा दिसून येत आहे.

कुडेगाव आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी
कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील औषध निर्माण अधिकारी १ , ओपीडी आरोग्य सेविका १ , परिचर २ , मुख्य आरोग्य सेविका १ असे एकुण पाच पदे रिक्त आहेत. सध्या सर्वत्रच कोरोना विषाणुची दहशत असून सर्वसाधारण सर्दी , खोकला व ताप अशी लक्षणे आढळून आल्यास सबंधितांवर प्राथमिक आरोग्य तपासणी व औषधोपचार करतांना देखील येथील अधिकारी कर्मचाºयांची तारांबळ उडतांना दिसून येत आहे.

Web Title: Vacancy of 25 staff posts under Kudegaon Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.