शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीने बांधलेली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

By admin | Updated: February 23, 2016 00:23 IST

येथील ग्रामपंचायत आवारात अतिक्रमण करून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने बांधकाम केलेली ...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई : शहापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हटविले अतिक्रमण शहापूर : येथील ग्रामपंचायत आवारात अतिक्रमण करून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने बांधकाम केलेली व्यापारी संकुलाची अनाधिकृत इमारत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहापूर ग्रामपंचायतने जमिनदोस्त केली. इमारत ज्या जागेवर बांधलेली होती त्या जागेच्या मालकी हक्काबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्यात न्यायालयात वाद सुरु होता. सोसायटीमध्ये सत्ताबदल होताच नवीन व्यवस्थापन समितीने मालकी नसल्याचे स्पष्ट केल्याने सदर जागेवर ग्रामपंचायतच्या मालकी हक्कावर शिक्कामोर्तब झाले होते.शहापूर येथील ग्रामपंचायतचा गावठाणमध्ये समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होण्यापूर्वी वादग्रस्त जागा ही ग्रामपंचायतच्या अखत्यारित होती. समोर ग्रामसेवक सदनिका मधात पटांगण व मागील भागात ग्रामपंचायत भवन व सभागृह होते. गावठाणात समाविष्ठ असलेल्या ग्रामपंचायत शेजारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची जागा आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर सोसायटीने जुन्या गोदामाचे रुपांतर व्यापारी संकुलात केले. ग्रामपंचायतची जागा असलेल्या लगतच्या जागेत बांधकाम करण्यात आले. सेवा सहकारी संस्थेने तयार केलेले व्यापारी संकुलातील गाळे दुकानदारासोबत करारनामा करुन भाड्याने दिली. पैकी ग्रामपंचायतच्या जागेवर असलेल्या चार गाळ््याचा वाद न्यायालयात असताना संस्थेच्या जुन्या व्यवस्थापक मंडळाने जागा व गाळे संस्थेचेच असल्याबाबत अपिल केले होते. दरम्यानच्या काळात संस्थेत सत्ताबदल झाले. आता अस्तित्वात असलेल्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने वादग्रस्त जागेवरील मालकी हक्क मागे घेतला. भाडेकरूसोबत नवीन करारनामा करण्यास मनाई केली. सदर जागा संस्थेची नसल्याचा निर्वाळा संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने केला. वादग्रस्त जागेसंबधी निर्णय ग्रामपंचायतच्या बाजूने लागल्यानंतर ग्रामपंचायतने सदर जागेवर असलेली व्यापारी संकुलांची इमारत पाडण्याची कार्यवाही सुरु केली. ग्रामपंचायतच्या जागेत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने अतिक्रमण पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला त्यांच्या जागेत असलेले संस्थेचे अतिक्रमण काढण्याची परवानगी दिल्यानंतर ग्रामपंचायतने विविध कार्यकारी संस्थेला अतिक्रमण काढण्यासाठी सुचना दिली. भाडेकरुनासुध्दा गाळे रिकामे करण्याकरिता कळविले. मात्र त्याचे पालन करण्यात न झाल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार ग्रामपंचायतने संस्थेद्वारा करण्यात आलेले चार गाळ््याचे अतिक्रमण पाडण्याची कारवाई केली.जेसीबी मशीनद्वारे ग्रामपंचायतच्या जागेवर असलेले संस्थेचे अतिक्रमण भुईसपाट करण्यात येवून जागा मोकळी करण्यात आली. अतिक्रमण हटविते वेळी पोलीस निरिक्षक राजेंद्र नागरे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. यावेळी विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले, नायब तहसीलदार तेलंग, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अलका रंगारी, ग्रामविकास अधिकारी आर.एन. डांगरे व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)