शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी नालीत कोसळून दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

शनिवारी सकाळी मोगरा गावातील काही नागरिकांना नालीत दुचाकी पडल्याचे दिसून आले. कुणाची दुचाकी आहे याची पाहणी करीत असताना तेथे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा रेंगेपार येथील महेश कामथे आणि राकेश देशमुख यांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आले. या घटनेची रेंगेपार येथे माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भाऊबिजेची ओवाळणी करुन बहिणीच्या घरुन गावी परतताना दुचाकी रस्त्यालगतच्या नालीत पडून दोन तरुण ठार झाले. ही घटना लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी येथे शनिवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. जखमी अवस्थेत रात्रभर दोघेही नालीत पडून राहिल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. महेश जगदीश कामथे (३२) व राकेश केवळराम देशमुख (३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी हे दोघे महेश कामथे यांच्या बहिणीकडे शिवणीबांध येथे गेले होते. भाऊबिजेची ओवाळणी झाल्यानंतर दुचाकी क्रमांक एमएच ३६ सी ४८९२ ने ते सायंकाळी ६ वाजता भूगावमार्गे रेंगेपारकडे येत होते. नानोरा ते माेगरा मार्गावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत जाऊन पडले. विशेष म्हणजे ही नाली पाण्याने तुडूंब भरलेली होती.शनिवारी सकाळी मोगरा गावातील काही नागरिकांना नालीत दुचाकी पडल्याचे दिसून आले. कुणाची दुचाकी आहे याची पाहणी करीत असताना तेथे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा रेंगेपार येथील महेश कामथे आणि राकेश देशमुख यांचे मृतदेह असल्याचे उघडकीस आले. या घटनेची रेंगेपार येथे माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबियांचा आक्रोश आसमंत भेदून टाकणारा होता. रात्रीच्या वेळी परत येत असताना ते दोघेही तरुण नालीत पडले. परंतु अंधारामुळे हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. रात्रभर नालीतच पडून राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार- लाखनी पोलिसांनी पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. लाखनी येथे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजता दोघांचेही मृतदेह त्यांच्या घरी आणण्यात आले. त्यावेळी घरच्यांनी एकच हंबरडा फोडला. सायंकाळी या दोघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. राकेश देशमुख हा अविवाहित होता. तर महेश याचा चार वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याला आठ दिवसाचा मुलगा आहे.

अपघात नेमका झाला कसा- भूगावमार्गे रेंगेपार कडे येत असताना नानोरा मोगरा गावाजवळील नाल्यात महेश आणि राकेश कोसळून मृत्युमुखी पडले. त्यांच्या दुचाकीला धडक दिली असावी. त्यामुळे दुचाकी अनियंत्रीत होऊन नालीत पडली असावी किंवा एखादे जनावरे आडवे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी नालीत पडली असावी असा अंदाज आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय कोरचे करीत आहेत.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू