शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

मान्यताविना कामांच्या देयकांचे दोनदा वाटप

By admin | Updated: July 23, 2014 23:27 IST

मग्रारोहयोच्या पालोरा येथील १५ लक्ष रुपयांच् या दोन सिमेंट रस्त्यांना जानेवारी २०१४ रोजी बिडीओंनी तांत्रीक व प्रशासकीय परवानगी दिली. त्यानंतर काही दिवसांनीच ६०:४० च्या प्रमाणात कुशल

करडी (पालोरा) : मग्रारोहयोच्या पालोरा येथील १५ लक्ष रुपयांच् या दोन सिमेंट रस्त्यांना जानेवारी २०१४ रोजी बिडीओंनी तांत्रीक व प्रशासकीय परवानगी दिली. त्यानंतर काही दिवसांनीच ६०:४० च्या प्रमाणात कुशल अथवा सिमेंट कामे बसत नसल्याचे पत्र ग्रामपंचायतीला देऊन कामे रद्द केली. ग्रामपंचायतीने पुन्हा परवानगी न मागता, अहवाल न देता जुलै २०१४ महिन्यात सिमेंट रस्त्याची कामे केली. मात्र दोन्ही कामांसाठी लागणाऱ्या मटेरियलचे देयक मे व जून २०१४ महिन्यात दिले गेले. सुमारे ३.७५ लाखांच्या देयकांना दोनदा मान्यता दिली. ती कशी व कोणत्या भूमिकेतून दिली या प्रकरणी चौकशी होण्याची गरज आहे.मोहाडी तालुक्यातील पालोरा येथे सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात मग्रारोहयोची कामे झाली नाहीत. त्यामुळे गावात सदर वर्षात कुशल व अकुशल कामांचे प्रमाण ६०:४० च्या प्रमाणात बसत नव्हते. असे असतानाही संगनमताने १५ लक्ष रुपयांच्या दोन सिमेंट रस्त्यांच्या कामांना मान्यता दिली गेली. दोन्ही कामांसाठी खंड विकास अधिकाऱ्यांनी अनुक्रमे ४ व ६ जानेवारी २०१४ रोजी तांत्रीक व प्रशासकीय मान्यता दिली. झालेली गंभूर चूक लक्षात येताच बिडीओंनी २० जानेवारी २०१४ रोजी पालोरा ग्रामपंचायतीला पत्र देऊन कामे ६०:४०च्या प्रमाणात बसत नसल्याचे कारण देत सिमेंट रस्त्याची कामे रद्द केली. तांत्रिक अभियंत्यासह अंदाजपत्रकांची तपासणी करून प्रमाणपत्राबाबत अहवाल द्यावा, प्रशासकीय मान्यता घेऊनच कामे करावी, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, अशी स्पष्ट सूचनाही पत्रातून दिली गेली.मात्र ग्रामपंचायतीने पत्राला केराची टोपली दाखवित बिनबोभाटपणे जुलै २०१४ च्या पहिल्या आठवड्यात सिमेंट रस्त्याच्या कामांना सुरुवात केली. एक काम पूर्ण झाले व दुसरे काम अपूर्ण असताना ग्रामपंचायतीने काम बंद केले. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. भय्या कनोजकर ते गणेश कुकडे या रस्त्यासाठी ६ लाख तर अंजनाबाई बारस्कर (साकोली रस्ता) ते सतीश गिऱ्हे या रस्त्यासाठी ९ लाख असा १५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. असे झाले देयकाचे वाटपसिईओंनी ६०:४०च्या प्रमाणात कामे बसत नसल्याचे कारण देत पालोरा येथील दोन्ही सिमेंट रस्त्यांचे काम रद्द केले. ग्रामपंचायतीने सुद्धा पुन्हा परवानगी घेतली नाही. मात्र दोन्ही कामे धडाक्यात केली. कामांना ३० मे २०१४ रोजी २.१५ लाख तर १९ जून २०१४ रोजी १.५० लाखाचा निधी देयकांसाठी मंजूर झाला. सदर निधी सिमेंट रस्त्याच्या मटेरियलसाठी दिला गेल्याने एकूण ३.७५ लाखाची देयके ग्रामपंचायतीने मटेरियल सप्लायरला दिले. कामांना देयकांसाठी निधी कोणी, कसा व कोणत्या भूमिकेतून दिला. यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता असल्याने चौकशी होणे गरजेचे आहे. कामांसाठी रोहयो मस्टरही पंचायत समिती स्तरावरून दिले गेले. त्यासाठी कुणी व केव्हा मंजुरी दिली याची चौकशी होणे तेवढेच गरजेचे आहे. (वार्ताहर)