शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन केलेल्या जागेवरूनच वळण महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

परसवाडा : तिरोडा नगर परिषदेची स्थापना १९५२मध्ये झाली. येथील मोठी जागा शेती व झुडपी जंगलात मोडते. हळूहळू तिरोडा ...

परसवाडा : तिरोडा नगर परिषदेची स्थापना १९५२मध्ये झाली. येथील मोठी जागा शेती व झुडपी जंगलात मोडते. हळूहळू तिरोडा शहर व तालुका विकसित होत गेले. घरे व लोकसंख्याही वाढत गेली. रस्ते बांधकामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात आले. मात्र त्यात एक प्रकार असाही आहे की, भूसंपादन होऊन अनेक वर्षे लोटली; पण त्याचा शेतमालकाला शासनाकडून मोबदलासुद्धा मिळाला नाही. तरी अद्याप वाहन वळण महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.

तिरोडा शहरातून दोन महामार्ग जातात. तुमसर-तिरोडा-गोंदिया हा एक महामार्ग तर दुसरा तिरोडा ते खैरलांजी बालाघाट हा आंतरराज्यीय महामार्ग असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा आहे. परंतु या दोन्ही महामार्गांना जोडणारा प्रशस्त असा वाहन वळण मार्ग तिरोडा शहरात नाही. त्यामुळे हलके वाहन असो किंवा अजवड वाहने असो, सर्व प्रकारच्या वाहनांना तिरोडा बाजार परिसरातूनच जावे लागते. यासाठी बसस्थानक, युनियन बँक वळण, कन्या शाळा, हुतात्मा स्मारक पोलीस ठाणे, अवंतीबाई चौक ते सरळ रेल्वे चौकी होत खैरलांजी, मध्य प्रदेश असा प्रवास होतो.

युनियन बँक ते अवंतीबाई चौकापर्यंत चार ठिकाणी वाहनाला वळण घ्यावे लागते. शिवाय या परिसरात सर्व व्यापारी लाइन दुकान असल्यामुळे नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे दोन महामार्गांना जोडण्यासाठी शहरातून वळणे होत जाणारा हा मार्ग अयोग्य आहे. तसेच दुसरा मार्ग म्हणजे तिरोडा-गोदिया मार्गावरील न्यायालयाच्या समोरून प्रेमबंधन लॉन; पण हाही रस्ता शहराच्या आतून जात असल्यामुळे अवजड वाहतुकीकरिता दोन्ही महामार्गांना जोडण्यासाठी उपयुक्त नाही.

खैरलांजी रोड, महाप्रज्ञा बुद्धविहार ते गोंदिया रोड बायपास रस्ता

यावर उपाययोजना करण्यासाठी तत्कालीन आमदार दिलीप बन्सोड यांच्या कार्यकाळात कार्यवाही करण्यात आली होती. तिरोडा-गोंदिया मार्गावरील चंद्रभागा स्मशान घाटाजवळील रूपाली बार ते तिरोडा-खैरलांजी मार्गावरील महाप्रज्ञा बुद्धविहार या दरम्यान भूमा क्र. १०/अ-२००७-२००८ मौजा खैरबोडी येथील ३०४.९५ हे.आर.मी.जमीन वळण मार्ग बांधकामासाठी संपादित करण्यात आली. कालांतराने सर्व शेतजमीनधारकांना त्यांचा मोबदलासुद्धा मिळाला आहे.

कुणाच्या परवानगीने शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने मार्किंग केली

अवंतीबाई चौक ते जावेद ट्रेडर्स या दरम्यानच्या रस्त्याचा भाग नगर परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत नाही, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बारापात्रे यांचे म्हणणे असून, यासंदर्भात पुरावेसुद्धा त्यांनी गोळा केले आहेत. शिवालय कन्स्ट्रक्शन कंपनीने आता जानेवारी २०२१ मध्ये दोन्ही बाजूंनी सहा-सहा मीटरची मार्किंग केली. त्यानुसार अतिक्रमण तोडून रस्ता बांधकाम करण्यात येणार होते. या मार्किंगला व्यापारी संघटनेचे सध्याच्या मुख्याधिकारी यांना विचारणा केली. भूसंपादित जागेतून वळण महामार्ग केल्यास व्यापारी संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा सुनील बारापात्रे व इतर व्यापाऱ्यांनी दिला आहे.