शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रेशन दुकानातून तूरडाळ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : कोरोना संक्रमण काळात स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र आता चार ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : कोरोना संक्रमण काळात स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळीचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र आता चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला असून रेशनमधून तूर डाळ गायब झाली आहे. अशीच स्थिती चणाडाळ, साखरबाबतही झाली आहे.

स्वस्त किमतीत अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना धान्य पुरवठा करण्यात येतो. मात्र खुल्या बाजारात महागड्या दराने विकली जाणारी तूर डाळ रेशनमधून मिळेनाशी झाली आहे. जिल्ह्यात २ लक्ष ३१ हजार १८ पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसह केशरी कार्डधारकांना गहू-तांदळासह अन्य धान्य दिले जाते. विद्यमान स्थितीत फक्त गहू आणि तांदळाचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानातून केला जात आहे. जिल्ह्यात ८८८ स्वस्त धान्य दुकाने असून एकूण कार्डधारकांची संख्या २ लक्ष ६२ हजार ३६६ इतकी आहे. सद्यस्थितीत गरिबांना खुल्या बाजारातून महागडी तूरडाळ खरेदी करावी लागत आहे.

डाळ नसल्याच्या तक्रारी कुठे?

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत एखाद्या शिधापत्रिकाधारकाला धान्य मिळत नसेल तर त्याची तक्रार संबंधित तालुकास्तरावर अन्ननिरीक्षकांकडे केली जाऊ शकते. तिथेही दाद न मिळाल्यास जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे तक्रार करुन हक्काचे रेशन मिळत नसल्याचे सांगण्यात येऊ शकते. झालेल्या तक्रारीसंदर्भात संबंधित विभागामार्फत चौकशी केल्यावर आरोप सिद्ध झाल्यास तक्रारीच्या संख्येवरुन संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही वेळप्रसंगी रद्द केला जाऊ शकतो. मात्र बहुतांश प्रसंगी तक्रारच होत नसल्याने अशावेळी कारवाईसुद्धा शून्य स्वरुपात असते.

रेशनवर काय मिळते?

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या स्वस्त धान्य दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ, डाळी, तेल, साखर व अन्य धान्याचा पुरवठा केला जातो. दोन महिन्यांपूर्वी गडचिरोली येथून आलेला निकृष्ट दर्जाचा मका स्वस्त धान्य दुकानातून वाटण्यात आला होता. यावेळी मोठी बोंबही झाली होती. वर्तमानस्थितीत रेशनवर फक्त गहू आणि तांदूळ मिळत आहे. नाफेडकडूनच डाळीचा पुरवठा होत नसल्याची बाब उघडकीला आली आहे. परिणामी शिधापत्रिकाधारक गहू आणि तांदळाची उचल करुन खुल्या बाजारातून साखर, डाळ विकत घेत आहेत. सणासुदीच्या काळात रेशनमधून तेलही मिळत असे. मात्र तेही आता बंद झाले आहे.

राॅकेल मिळेना

एकेकाळी किराणा दुकानातून मिळणारे राॅकेल स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध व्हायचे. शहरस्तरावर आता राॅकेल मिळणे बंद झाले आहे. गावातही अशीच स्थिती आहे. मात्र राॅकेलचा काळाबाजार सुरु असून यावर आधारित लहान मोठे व्यवसाय मात्र सुरु असल्याने राॅकेल उपलब्ध होत असते.