शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्वासू’नेच केला वृद्धेचा खून

By admin | Updated: June 13, 2015 00:44 IST

पंधरा दिवसांपुर्वी तालुक्यातील साखरा येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाला होता.

प्रकरण साखरा येथील खूनाचे : मारेकऱ्याला पाच दिवसांची पोलीस कोठडीलाखांदूर : पंधरा दिवसांपुर्वी तालुक्यातील साखरा येथील एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाला होता. पोलीस प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करूनही मारेकऱ्याचा शोध लागत नव्हता. अखेर पोलीस यंत्रणा कामाला लागली अन् मृतक महिलेचा खास विश्वासू व्यक्तीच खुनी असल्याचे तपासाअंती उघड झाले. आरोपीला अटक केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.जमना श्रावण शहारे (६५) रा. साखरा असे मृतक महिलेचे नाव असून वसंता गणपत भांडरकर (५३) रा. साखरा असे मारेकऱ्याचे नाव आहे. वसंता भांडरकर हा जमनाबाईचा आर्थिक व्यवहार ते सांगितलेली सर्व कामे तो निमुटपणे करायचा. जमनाबाईला अपत्य नसल्याने ती वसंताच्या विश्वासावरच अवलंबून होती. १० वर्षापुर्वी जमनाबाईचे पती मृत पावल्याने वसंताकडूनच सर्व कामे करवून घ्यायची. काही दिवसापासून वसंताने जमनाला पैशाची मागणी केली होती. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. याचाच राग अनावर झाल्याने दि.२५ मे रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास वरवंट्याने तिच्या डोक्यावर वार करून ठार मारल्याची कबुली दिली. पंधरा दिवसापासून दिघोरीचे सहायक पोलीस निरीक्षक पी.जे. यादव खून प्रकारणाच्या शोधात होते. अनेकांना संशयावरून ताब्यात घेतले. मात्र खुनापर्यंत पोहोचू शकले नाही. आरोपीच्या हालचाली व कागदपत्रावरून संशय बळावला. या आधारावर आरोपीचे घराची झडती घेतली असता गाईच्या गोठ्यात जमिनीत १५ हजार ७२० रूपये आढळून आले. रक्ताने भरलेले कपडेही जप्त करण्यात आले. त्याने पोलिसापुढे गुन्हा कबूल केला. पंधरा दिवसापासून तपास लागला नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांनी घटना स्थळाला भेट देवून तपासाची दिशा दिली. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. लाखांदूर दिवाणी न्यायालयात हजर करून पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. पोलीस निरीक्षक यादव, प्रकाश तलमले, शिपाई प्रमोद बागडे, पुराम, बुरडे, गुलाब घासले यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)