वृक्षलागवडीद्वारे शहिदांना वाहिली आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:08+5:30

जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tributes paid to the martyrs through tree plantation | वृक्षलागवडीद्वारे शहिदांना वाहिली आदरांजली

वृक्षलागवडीद्वारे शहिदांना वाहिली आदरांजली

Next
ठळक मुद्दे‘घन वन’ची वर्षपूर्ती : वैद्यकीय जन जागृती मंचचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून हनुमान टेकडी, आॅक्सिजन पार्क येथे वैद्यकीय जन जागृती मंचाने वर्ध्यातील सामाजिक संघटनांना आवाहन करून शहिदांना आदरांजली वाहण्यासाठी वृक्षलागवड करून मियावाकी जलद घन वन तयार केले. त्याला रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. यावेळी स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, उपवनसंरक्षक सुनील शर्मा, विभागीय वनाधिकारी डी. एन. जोशी, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंदी विश्व विद्यालयाचे बुद्धदास मिरगे, आधारवडचे अध्यक्ष प्रा. शेख हाशम, पांडुरंग भालशंकर, अ‍ॅक्टिव्ह बडीस क्लबचे सदस्य आणि अनेक संवेदनशील नागरिक उपस्थित होते. वैद्यकीय जन जागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी प्रत्येकाच्या मनात देशभक्ती अशीच झाडांच्या वाढीप्रमाणे वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा केली. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता वैद्यकीय जन जागृती मंचच्या सदस्यांसह हितेश इमाने यांनी सहकार्य केले.

Web Title: Tributes paid to the martyrs through tree plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.